Speed Train : हवेशी गप्पा कसल्या, थेट हवेतच उडते ही ट्रेन! स्पीड इतका की, पापणी लवताच…

Speed Train : देशात आता कुठे भारतीय रेल्वे हवेशी गप्पा गोष्टी करत आहे. पण या देशातील ट्रेन हवेशी नाही तर वेगाशी गप्पा गोष्टी करत आहे. जाणून घ्या काय आहे स्काय ट्रेन...

Speed Train : हवेशी गप्पा कसल्या, थेट हवेतच उडते ही ट्रेन! स्पीड इतका की, पापणी लवताच...
Follow us
| Updated on: May 26, 2023 | 8:36 PM

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेचा (Indian Railway) विस्तार फुल स्पीडने होत आहे. राजधानी-शताब्दी अशा ट्रेन आता इतिहास ठरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून वंदे भारत ट्रेन (Vande Bharat Express), बुलेट ट्रेनच्या देशात चर्चा रंगल्या आहेत. देशातील रेल्वेचा वेग वाढला आहे. भारतीय रेल्वे अजूनही रुळावरुन धावतात. आता तुम्ही म्हणाल मग रेल्वे रुळावरुन नाही धावणार तर मग काय हवेतून उडणार का? तर याचं उत्तर हो असंच आहे. या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. पण आता हवेतून उडणारी ट्रेन दिसणार आहे. म्हणजे ही ट्रेन हवेत तरंगत धावेल. पण असं नशीब सध्या भारतीय प्रवाशांचं नाही, तर हा देश ही किमया साधणार आहे.

चीनने केला कारनामा ही गोष्ट चीनने शक्य करुन दाखवली आहे. येथे ट्रेन रुळावरुन नाही तर हवेत तरंगत सुसाट धावणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच चीनने हा कारनामा करुन दाखवला आहे. लो-व्हॅक्यूम पाईपलाईनमध्ये चालणारी अल्ट्रा-हाय-स्पीड मॅग्लेव ट्रेनचे चीनमध्ये यशस्वी परिक्षण करण्यात आले. ही ट्रेन जमिनीपासून वर एका खासप्रकारच्या तंत्राच्या सहायाने लटकत धावेल. सध्या ही रेल्वे एका ट्रॅकवर धावत आहे. पण लवकरच या प्रकल्पाचा विस्तार संपूर्ण चीनमध्ये करण्यात येणार आहे. रेड ट्रेन असे या ट्रेनचे नाव आहे. येथील नागरिक तिला स्काय ट्रेन असे म्हणतात. हेच नाव चीनमध्ये लोकप्रिय झाले आहे.

हे सुद्धा वाचा

याठिकाणी झाली सुरुवात चीनच्या जिंगगुओ काऊंटीमध्ये पहिली मॅग्लेव लाईन सुरु झाली आहे. 2600 फुट ट्रॅकवर येथे स्काय ट्रेन सुसाट पळत आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत. ही ट्रेन 80.5 प्रति तास या वेगाने धावत आहे. शक्तिशाली चुंबक शक्तीमुळे ही ट्रेन हवेत लटकून धावते. ही ट्रेन जमिनीपासून 33 फुटावर धावते. सध्या ही मॅग्लेव लाईन व्यावसायिक वापरासाठी सुरु आहे. सध्या ही स्काय ट्रेन शंघाईच्या पुडोंग एअरपोर्ट ते लोंगयांग रोड स्टेशन यांना जोडते.

अवघ्या 7 मिनिटात … चीनच्या जिंगगुओ काऊंटीमध्ये पहिली मॅग्लेव लाईन सुरु झाली आहे. 2600 फुट ट्रॅकवर येथे स्काय ट्रेन सुसाट पळत आहे. शक्तिशाली चुंबकांच्या सहायाने हा प्रयोग सुरु आहे. ही ट्रेन जोरदार धावते. ही ट्रेन 30 किमीचे अंतर केवळ 7 मिनिटात कापते. या ट्रेनमध्ये एकावेळी 88 जण प्रवास करु शकतात. पण सध्या ही ट्रेन व्यावसायिक वापरासाठी करण्यात येत आहे.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.