AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या गावात महिलांचे राज्य, पुरुषांच्या प्रवेशाला आहे सक्त मनाई

सीएनएन न्यूजने दिलेल्या बातमीनूसार घानाचे फोटोग्राफर पॉल निंसन यांना एका ब्लॉग पोस्टमुळे या गावाचा शोध लागला.

या गावात महिलांचे राज्य, पुरुषांच्या प्रवेशाला आहे सक्त मनाई
umojaImage Credit source: socialmedia
| Updated on: Jul 07, 2023 | 12:35 PM
Share

नैरोबी : जगात एक असे गाव आहे, ज्या गावात केवळ महिलांचे ( Women Power ) राज्य आहे. या गावात केवळ महिलाच राहतात पुरुषांना येण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे अशा गावात महिला त्यांच्या मुलांचाही अठरा वर्षांनंतर त्याग करीत असतात. उत्तर केनियातील ( North kenya ) सॅमबुरु काऊंटीतील उमोजा ( Umoja ) नावाचे एक गाव आहे. आदिवासी वस्ती असलेल्या या गावात पुरुषांचे प्रमाण शून्य आहे. उमोजा या शब्दाचा अर्थ स्वाहीली भाषेत एकता असा होतो. तर या गावाचा इतिहास आपण पाहूया…

साल 1990 मध्ये लैगिंक हिंसाचाराला कंटाळून पळून आलेल्या स्रियांनी या गावात आधार घेतला. त्यांचे सुरक्षा शिबिर म्हणून या गावाची स्थापना झाली. आज हे गाव सर्व वयोगटातील महिलांचे माहेर घर बनले आहे. मुलींच्या सुरक्षेसाठी या गावात पुरुषांच्या प्रवेशाला मनाई आहे. उमोजा गावात ज्या महिला राहतात. ज्यांनी केव्हा ना केव्हा पुरुषी अत्याचारांचा सामना करावा लागला, किंवा पुरुषांनी त्याला सोडले, किंवा खतना होण्यापासून वाचण्यासाठी महिला येथे येऊन राहील्या. सीएनएन न्यूजने दिलेल्या बातमीनूसार घानाचे फोटोग्राफर पॉल निंसन यांना  एका ब्लॉग पोस्टमुळे या गावाचा शोध लागला.

साल 2017 मध्ये निंसन याने या गावाची बातमी आणि फोटोग्राफी करण्यासाठी केनियाला जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना या महिलांशी थेट संपर्क करता न आल्याने सारखे वाट चुकत राहीले. त्यांना केवळ जनरल लोकेशन माहीती होती. उमोजाचे काही माजी सदस्य जे सम्बुरु गावात रहात होते. या गावाची लोकसंख्या सारखी बदलत असते. या आत्मनिर्भर गावात महिला आणि त्यांच्या मुलांनी बांधलेली पन्नास कुटुंबांची घरे आहेत.

एका छायाचित्रकाराने जगापुढे आणले

गावात महिलांना त्यांचे अधिकार आणि लिंग आधारित हिंसेविषयी कायम शिक्षण दिले जाते. महिलांच्या मुलांना केवळ अठरा वयोगटापर्यंत रहाण्याची परवानगी आहे. पॉल निंसन यांनी म्हटले की या गावात पोहचणे कठीण होते. त्यांचा हेतू समजल्यानंतरच आणि त्यांनी काढलेली छायाचित्रे पाहिल्यानंतर त्यांना या गावात प्रवेश मिळाला. त्यांची काढलेली छायाचित्रं पाहून महिला खूष झाल्या.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.