Optical Illusion | या चित्रात लपलेलं कासव शोधून दाखवा!
तुम्हालाही भ्रम सोडवायला आवडत असतील तर आज आम्ही तुमच्यासाठी असेच एक कोडे घेऊन आलो आहोत हे कोडे खूप अवघड आहे. तुमचं जर निरीक्षण कौशल्य चांगलं असेल तर तुम्हाला याच उत्तर चुटकीसरशी मिळेल. या कोड्यामध्ये तुम्हाला चित्रात लपलेले कासव शोधून काढायचे आहेत.

मुंबई: डोळ्यांना फसवणारे फोटो आजकाल युजर्सचे लक्ष वेधून घेत आहेत. या छायाचित्रांची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यांना पहिल्यांदा पाहून आपण पूर्णपणे गोंधळून जातो. आपला इतका गोंधळ उडतो की आपण अक्षरशः गोंधळून जातो आणि आपलं लक्ष विचलित होतं. तुम्हालाही भ्रम सोडवायला आवडत असतील तर आज आम्ही तुमच्यासाठी असेच एक कोडे घेऊन आलो आहोत हे कोडे खूप अवघड आहे. तुमचं जर निरीक्षण कौशल्य चांगलं असेल तर तुम्हाला याच उत्तर चुटकीसरशी मिळेल. या कोड्यामध्ये तुम्हाला चित्रात लपलेले कासव शोधून काढायचे आहेत.
व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा एका खोलीचा फोटो आहे. या खोलीत फरशीवर कार्पेट टाकलेलं आहे. या कार्पेटची डिझाइन खूप सुंदर आहे. यासोबतच या फोटोमध्ये एका बाजूला बॅगही ठेवण्यात आली आहे. या कार्पेटवर एक कासव आहे. हे कासव तुम्हाला शोधायचं आहे. हे शोधणं कठीण आहे कारण कार्पेटची नक्षी आणि कासव एकमेकांत मिसळले आहेत. हेच खरं आव्हान आहे. लक्षात ठेवा की तुमच्याकडे फक्त 10 सेकंद आहेत. जर तुम्ही ठरलेल्या वेळेत हे करून दाखवलं तर तुम्ही खूप हुशार आहात. याशिवाय तुमची निरीक्षण शक्ती देखील चांगली आहे असं आपण म्हणू.
चला सांगा, तुम्हाला या चित्रात कासव सापडले का? तुम्हाला जर कासव दिसले असेल तर अभिनंदन. जर कासव दिसले नसेल तर नाराज व्हायची गरज नाही कारण अशा लोकांसाठी आम्ही खाली उत्तर देत आहोत. खालचे चित्र बघा, हे कासव दिसणं तसं अवघडच होतं. पण उत्तम निरीक्षण असेल तर अशक्य गोष्ट देखील शक्य आहे.

spot the turtle
