चित्रात एक कुत्रं लपलंय ते तुम्हाला शोधून काढायचंय!
एक खोली आणि त्यात एक कुत्रा बसलेला आहे, असं हे चित्र आहे. या कुत्र्याला शोधा आणि तो कुठे आहे ते सांगा.

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मजेशीर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले जातात. यातील काही ऑप्टिकल भ्रम आहेत. ऑप्टिकल भ्रमाचा खासियत अशी आहे की आपण अशा प्रकारचे चित्र बघून फसतो. आपला मेंदू गोंधळतो आणि मन विचलित होतं. जसं चित्र दिसेल तसाच आपण विश्वास ठेवतो. पण असं नसतं या चित्रांमध्ये अनेक गोष्टी लपलेल्या असतात. असाच एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये कुत्रा एका खोलीत लपला आहे आणि तो कुत्रा कुठे आहे हे तुम्हाला शोधायचा आहे. चला तर मग, आज असाही रविवार आहे. बसल्या बसल्या आपण एक कुत्रा तर शोधूच शकतो.
या चित्रात बऱ्याच गोष्टी दिसत आहेत. एक खोली आणि त्यात एक काळा कुत्रा बसलेला आहे, असं हे चित्र आहे. या कुत्र्याला शोधा आणि तो कुठे आहे ते सांगा.
ऑप्टिकल भ्रमाचे हे चित्र गोंधळून टाकतात. अशा चित्रांमुळे आपलं निरीक्षण कौशल्य वाढतं, चौकस विचार करण्याची सवय लागते.
इतकेच नव्हे तर एखाद्या चित्राकडे बघून आपला मेंदू कसा काम करतो हे समजण्यास सुद्धा आपल्याला मदत होते. असे हे चित्र आहे.
या चित्राची गंमत म्हणजे कुत्रा अजिबात दिसत नाही. एक वस्तू खोलीत नक्कीच पडून आहे पण तो कुत्रा नाही. हा कुत्रा सहजासहजी दिसणार नाही. पण ते सापडलं तर तुम्ही हुशार आहात.
खरं तर ज्या ठिकाणी खोलीचा काही भाग काळा आहे, त्या ठिकाणी हा कुत्रा दिसतो. हा कुत्राही काळा आणि पूर्णपणे लपलेला आहे.
एकतर हे चित्र काढतानाच असं काढलंय किंवा तिथे अंधार आहे. पण नीट निरखून पाहिलं तर कुत्रा कुठे आहे हे कळतं
