AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वर्ग-नरकाचे इथं दार; या मंदिरात जगाच्या अंताचे रहस्य उलगडणार, कुठंय ते चमत्कारिक ठिकाण

patal bhuvaneshwar temple : तर हे प्राचीन शिवमंदिर आहे. या ठिकाणाला स्वर्ग-नरकाचे द्वार म्हणतात. या मंदिरात जगाच्या अंताचे रहस्य दडल्याचे सांगितले जाते. काय आहे यामागील कहाणी, तुम्ही ऐकली का कधी?

स्वर्ग-नरकाचे इथं दार; या मंदिरात जगाच्या अंताचे रहस्य उलगडणार, कुठंय ते चमत्कारिक ठिकाण
अनोखे मंदिर
| Updated on: Aug 08, 2025 | 4:52 PM
Share

आपल्या देशात अनेक प्राचीन मंदिरं आहेत. त्यांच्या रहस्याविषयी आतापर्यंत कोणीही ठामपणे काही सांगत नाही. असंच एक मंदिरा आहे. पाताळात जाण्याचा मार्ग येथून जातो, असे येथील लोक सांगतात. जग कधी नष्ट होणार याविषयीचे रहस्य या मंदिरात दडल्याचा दावा करण्यात येतो. जर तुम्हाला या धार्मिक पर्यटन स्थळी जायचे असेल तर वाट नक्कीच फार अवघड नाही.

तर या मंदिराचे नाव पाताळ भुवनेश्वर मंदिर असे आहे. त्याची रचना इतर मंदिरांपेक्षा निश्चितच वेगळी आहे. या मंदिरात 90 फुट एक खोल गुफा आहे. या गुफेतून खाली गेल्यावर मंदिराचा गाभारा लागतो. या मंदिरात जग नष्ट होण्यासंबंधीचे रहस्य दडल्याचा दावा करण्यात येतो. या मंदिरात प्रवेश करताच शेषनागाची आकृती दिसते. या नागाच्या फणीवरच पृथ्वीचा भार असल्याची मान्यता आहे. पाताल भुवनेश्वर मंदिरात भगवान शंकराचे निवास असल्याची मान्यता आहे.

या गुफेतून मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत जाण्यासाठीची वाट बिकट आहे. भक्तांना या गुफेतून सहज मुख्य मंदिरात जाता यावे यासाठी दोन्ही बाजूंना साखळ्या लावण्यात आल्या आहेत. भाविकांच्या मते साखळ्या जरी लावल्या असल्या तरी या मंदिरात पोहचणे आणि या मंदिरातून बाहेर पडणे हे मोठे दिव्यच आहे.

काय आहे ते रहस्य?

या मंदिराच्या गुफेत स्वर्ग, नरक, मोक्ष आणि पाप असे चार दरवाजे आहेत, अशी मान्यता आहे. येथे 33 देवी-देवतांचे एकदाच दर्शन करता येते. येथे गणपती आहे. त्यावर एक ब्रह्म कमळ आहे. त्यातून पाणी टपकत असते. येथील शिवलिंग सातत्याने वाढत आहे. अशी मान्यता आहे की, हे शिवलिंग ज्या दिवशी या गुफेच्या छताला टेकेल, त्यावेळी हे जग नष्ट होईल. हे शिवलिंग वाढत असल्याचा दावा स्थानिक करतात.

कसे जाणार या ठिकाणी

उत्तराखंडातील पिठोरागड जिल्ह्यातील गंगोलीहाटपासून जवळच 14 किलोमीटरवर हे पाताळ भुवनेश्वर मंदिर आहे. त्याची गुफा जवळपास 160 मीटर लांब आणि 90 फुट खोल आहे. रेल्वेने पाताळ भुवनेश्वरसाठी जवळचे रेल्वे स्टेशन टनकपूर आहे. ते 154 किलोमीटर दूर आहे. टनकपूर रेल्वे स्टेशन ते पाताल भुवनेश्वर, गंगोलीहाट आणि लोहाघाट साठी टॅक्सी अथवा बसने सहज जाता येते. टनकपूर रेल्वे स्टेशन हे लखनऊ, दिल्ली, आग्रा आणि कोलकत्ता या शहरांशी जोडले गेलेले आहे. येथे रस्त्याने पण सहज जाता येते.

(डिस्क्लेमर : उपलब्ध स्त्रोतावरून ही माहिती देण्यात आली आहे. टीव्ही 9 त्याला दुजोरा देत नाही.)

पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.