पोपच्या अकाऊण्टवरुन बिकीनी फोटो लाईक, मॉडेल म्हणते, “चला… मी स्वर्गात जाणार”
ख्रिस्ती धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांच्या इन्स्टाग्राम अकाऊण्टवरुन मॉडेल मार्गेट फॉक्सचा फोटो लाईक करण्यात आला

व्हॅटिकन सिटी Pope Francis : सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या युजर्सच्या नजरेतून कोणीच सुटू शकत नाहीत. ख्रिस्ती धर्मगुरु पोप फ्रान्सिस (Pope Francis) पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत. पोप फ्रान्सिस यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एका मॉडेलचा बिकीनी फोटो लाईक करण्यात आला. अशा प्रकारचा फोटो धर्मगुरुंनी लाईक केल्यामुळे जगभरात चर्चेचा विषय झाला आहे. (Pope Francis Instagram Handle Likes Bikini Model Margot Foxx Photo)
ख्रिस्ती धर्मगुरु पोप फ्रान्सिस (Pope Francis) यांच्या इन्स्टाग्राम अकाऊण्टवरुन मॉडेल मार्गेट फॉक्सचा (Margot Foxx) फोटो लाईक करण्यात आला. या फोटोमध्ये मार्गेटने काळ्या रंगाचा स्विमसूट घातला आहे. पोपच्या अकाऊण्टवरुन आलेल्या लाईकचा स्क्रीनशॉट खुद्द मार्गेटनेच शेअर केला. ‘पोपनी माझा फोटो लाईक केला, म्हणजे मी स्वर्गात जाणार’ असं तिने ट्विटरवर फोटो पोस्ट करत लिहिलं. त्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली.
uhhh the pope liked my picture? pic.twitter.com/b4hOj2vYHO
— Margot ? (@margot_foxx) November 19, 2020
the pope liked my picture that means i’m going to heaven ?
— Margot ? (@margot_foxx) December 22, 2020
कॅथलिक न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार पोप फ्रान्सिस यांची सोशल मीडिया अकाऊण्ट्स एका टीमद्वारे हँडल केली जाते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी अंतर्गत समिती स्थापन करण्यात आली आहे. पोप फ्रान्सिसच्या इन्स्टाग्राम अकाऊण्टला 74 लाख फॉलोअर्स आहेत. मात्र या अकाऊण्टवरुन कोणालाही फॉलो केले जात नाही. पोपच्या ट्विटर अकाऊण्टवर 1 कोटी 88 लाख फॉलोअर्स आहेत.
याआधीही पोप फ्रान्सिस (Pope Francis) यांच्या इन्स्टाग्राम अकाऊण्टवरुन ब्राझिलियन मॉडेल नतालिया गॅरीबोटो (Natalia Garibotto) हिचा फोटो लाईक करण्यात आला होता. त्यानंतर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता.
(Pope Francis Instagram Handle Likes Bikini Model Margot Foxx Photo)
