Vegetable Vendor 11 Crore Rupee Lottery : याला म्हणतात सच्ची दोस्ती, 11 कोटीची लॉटरी जिंकणारा भाजीवाला मित्राला देणार इतके कोटी, कारण…
Vegetable Vendor 11 Crore Rupee Lottery : एका लॉटरीच्या तिकीटाने भाजीवाल्याचं नशिब पालटलं आहे. जे त्याला वाटलं नव्हतं तो चमत्कार त्याच्या आयुष्यात घडला. एक हजार रुपयाच्या तिकीटात भाजीवाल्याला 11 कोटींची लॉटरी लागली. त्याचं आयुष्यच बदलून गेलय.

राजस्थानच्या जयपूरमधील कोटपुतली येथील अमित सध्या चर्चेत आहे. लोकांना फक्त त्याच्या नशिबाचं कौतुक नाहीय, तर त्याची विनम्रता आणि मित्राची मदत लक्षात ठेवण्याच्या त्याच्या गुणाचही कौतुक आहे. भाजी विकून कुटुंबाच पालनपोषण करणारा अमित नवीन कोट्याधीश आहे. पण मनाने तो खूप आधीपासून श्रीमंत आहे. ज्या मित्राकडून 1000 रुपये उधार घेऊन तो 11 कोटीची लॉटरी जिंकला, त्याला एक कोटी रुपये देण्याचा अमितचा विचार आहे.
अमित सेहराचा एक मित्र पंजाबमध्ये राहतो. पंजाब फिरण्यासाठी म्हणून अमित मुकेशकडे गेला होता. भतिंडा येथे एका लॉटरीच्या दुकानावर त्याला गर्दी दिसली. लॉटरी विकत घेण्यासाठी मोठी गर्दी होती. म्हणून आपणही तिकीट काढावं असं अमितला वाटलं. त्याला लॉटरीमध्ये आपलं नशीब आजमावायचं होतं. पण तिकीट विकत घेण्यासाठी 500 रुपयांची आवश्यकता होती. अमितच्या खिशात त्यावेळी तिकीटासाठी पैसे नव्हते. त्याने लगेच मुकेशकडून 1 हजार रुपये उधारीवर घेतले.
दुसरं तिकीट कोणाच्या नावावर घेतलं?
अमित सेहराने दुकानातून दोन लॉटरीच्या तिकीट विकत घेतल्या. त्याने एक तिकीट पत्नीच्या आणि एक स्वत:च्या नावावर घेतलं. पंजाब स्टेट लॉटरी दिवाळी बंपर 2025 साठी 11 कोटीचा जॅकपॉट निघणार होता. अमितने उधारीवर लॉटरीची तिकीट विकत घेतली, त्यावेळी आयुष्यात पुन्हा कधी कोणाकडून उधारी घ्यावी लागणार नाही हे त्याला कुठे ठाऊक होतं. लॉटरीची तिकीट विकत घेऊन तो पंजाबवरुन राजस्थानला परत आला. जेव्हा त्याला समजलं की, तो इतक्या कोटीची लॉटरी जिंकलाय. त्यावेळी त्याला मनोमन भरपूर आनंद झाला. या प्रसंगी त्याने देवाचे आभार मानले. तसच मित्र मुकेशची मदतही विसरला नाही, त्याच्याकडूनच त्याने 1 हजार रुपये उधार घेऊन तिकीट विकत घेतलेली.
अमित मुकेशला किती कोटी देणार?
अमित सेहरा भावुक झालेला. लॉटरीची रक्कम घेण्याची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी त्याला चंदीगडला जायचं होतं. त्यासाठी सुद्धा त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. भाजी विक्रीचा स्टॉल लावणाऱ्या अमित सेहराने म्हटलं की हा देवाचा आशीर्वाद आहे. छप्पर फाडून देवाने दिलय. हा पैसा अमित मुलांच्या शिक्षणावर खर्च करणार आहे. एक घरही बनवणार आहे. त्याशिवाय लॉटरी तिकीटासाठी पैसे देणाऱ्या मुकेशला 1 कोटी रुपये देणार आहे. मुकेशला दोन मुली असून त्यांना प्रत्येकी 50-50 लाख रुपये देणार आहे.
