AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramleela Video: रामलीलामध्ये संजीवनी बुटी घेऊन जात होते हनुमानजी, हवेत असताना क्रेनचा दौर तुटला, मग…व्हिडिओ व्हायरल

Ramleela Viral Video: व्हायरल झालेला 24 सेकंदाच्या या व्हिडिओत 20 सेंकदानंतर अपघात होतो. त्या अपघातानंतर सर्वत्र धावपळ सुरु होते. परंतु हा व्हिडिओ कुठला आहे अन् ही घटना केव्हा घडली, त्याची माहिती उपलब्ध नाही.

Ramleela Video: रामलीलामध्ये संजीवनी बुटी घेऊन जात होते हनुमानजी, हवेत असताना क्रेनचा दौर तुटला, मग...व्हिडिओ व्हायरल
व्हायरल व्हिडिओतील दृश्य
| Updated on: Oct 05, 2024 | 2:22 PM
Share

Ramleela Viral Video: दसरा जवळ येताच रामलीलाचे कार्यक्रम अनेक ठिकाणी होतात. शारदीय नवरात्रापासून दसरापर्यंत अनेक कार्यक्रम होत असतात. रामलीलाच्या कार्यक्रमात झालेल्या एका चुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओत संजीवनी बुटी घेऊन हनुमानजी उडत आहे, असा देखावा आहे. नाटकातील हनुमानजी एक क्रेनच्या मदतीने हवेत उडत आहे. त्याचवेळी क्रेनचा दोरखंड तुटतो. त्यानंतर हनुमानजीची भूमिका कलाकार जोराने जमिनीवट आपटतो.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

रामायणमधील कथेनुसार, हनुमानजी संजीवनी बुटी आणण्यासाठी द्रोणागिरी पर्वतावर गेले होते. त्या ठिकाणावरुन संजीवनी बुटी आणून लक्ष्मणजीचे प्राण वाचवतात. हा देखावा रामलीलेत सादर करण्यात येत होता. त्या देखाव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात संजीवनी बुटी घेऊन उडणारे हनुमानजी क्रेनमधील गडबडीमुळे हवेतून सरळ जमिनीवर आपटतात. हे दृश्य पाहून सर्व जण हादरुन जातात. आयोजक त्या ठिकाणी धाव घेताना दिसत आहेत.

व्हिडिओ कुठला, ही माहिती…

24 सेकंदाच्या या व्हिडिओत 20 सेंकदानंतर अपघात होतो. त्या अपघातानंतर सर्वत्र धावपळ सुरु होते. परंतु हा व्हिडिओ कुठला आहे अन् ही घटना केव्हा घडली, त्याची माहिती उपलब्ध नाही. या व्हिडिओवरुन इंटरनेट युजर क्रेन सर्व्हिसवाल्यास चांगलेच ट्रोल करत आहे. त्याच्याविरोधात संताप युजरच्या दिसत आहे.

कमेंट सेक्शनमध्ये युजर्स हनुमानजीची भूमिका साकारणाऱ्या व्यक्तीच्या बद्दल खेद व्यक्त करताना दिसत आहेत. एका व्यक्तीने लिहिले – क्रेन सर्व्हिसवाल्याने निकृष्ट दर्जाची दोरी वापरली असावी. तर काही युजरने हसण्याच्या इमोजीसह प्रतिक्रिया दिली आहे. या व्हिडिओला 3 लाखपेक्षा जास्त युजर्सने लाइक केले आहे. या व्हिडिओला 10 हजारांपेक्षा जास्त कमेंटसुद्धा आल्या आहेत.

Follow Us
युद्धाचा मोठा फटका गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी विविध शहरांमध्ये..
युद्धाचा मोठा फटका गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी विविध शहरांमध्ये...
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा समितीची बैठक
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा समितीची बैठक.
पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस टंचाईचा फटका; केटरिंग व्यवसाय अडचणीत
पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस टंचाईचा फटका; केटरिंग व्यवसाय अडचणीत.
गॅस तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद
गॅस तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद.
नागपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा
नागपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा.
बीडमध्ये घरगुती गॅस वापरणाऱ्या हॉटेल्सवर छापेमारी; 28 सिलेंडर जप्त
बीडमध्ये घरगुती गॅस वापरणाऱ्या हॉटेल्सवर छापेमारी; 28 सिलेंडर जप्त.
हिंगोलीत गॅस तुटवडा; व्यावसायिक सिलेंडर बंद, स्वीटमार्ट परिणाम
हिंगोलीत गॅस तुटवडा; व्यावसायिक सिलेंडर बंद, स्वीटमार्ट परिणाम.
रमजान महिना सुरु; मुंबईचा मोहम्मद अली रोड खवय्यांनी गजबजला
रमजान महिना सुरु; मुंबईचा मोहम्मद अली रोड खवय्यांनी गजबजला.
भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि केदार शिंदेंसह अनेक कलाकार बनले मनसेचे..
भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि केदार शिंदेंसह अनेक कलाकार बनले मनसेचे...
इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा डोंबिवली MIDC उद्योगांना मोठा फटका
इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा डोंबिवली MIDC उद्योगांना मोठा फटका.