AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Russia Ukraine crisis : युक्रेनमध्ये अडकलेल्या जोडप्याची मन हेलावणारी गोष्ट; अखेर जोडपे दत्तक मुलासह अमेरिकेत परतले

गेल्या काही दिवसांपासून युक्रेन (Ukraine) आणि रशियामध्ये (Russia) तणाव सुरू आहे. या पार्श्वभूमीवर युक्रेनमधील अमेरिकन नागरिकांनी (American citizens) अमेरिकेत परतावे अशा सूचना युक्रेनमधील अमेरिकेच्या दुतावासाकडून देण्यात आल्या आहेत.

Russia Ukraine crisis : युक्रेनमध्ये अडकलेल्या जोडप्याची मन हेलावणारी गोष्ट; अखेर जोडपे दत्तक मुलासह अमेरिकेत परतले
| Updated on: Feb 25, 2022 | 9:01 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून युक्रेन (Ukraine) आणि रशियामध्ये (Russia) तणाव सुरू आहे. या पार्श्वभूमीवर युक्रेनमधील अमेरिकन नागरिकांनी (American citizens) अमेरिकेत परतावे अशा सूचना युक्रेनमधील अमेरिकेच्या दुतावासाकडून देण्यात आल्या होत्या. अमेरिकन दुतावासाकडून देण्यात आलेल्या सूचनेप्रमाणे नागरिकांनी अमेरिकेत परतीचा प्रवास सुरू केला होता. मात्र या सर्व प्रकारात एका जोडप्याची चांगलीच फरफट झाली. हे जोडपे मुळे अमेरिकेचे आहे, युक्रेनमध्ये वास्तव्यास होते. त्यांनी युक्रेनमध्ये एक मुलं दत्तक घेण्याचा निर्णय घेतला होता. हा मुलागा आधीच न्युमोनियाने पीडित होता. तरी देखील त्यांनी या मुलाला दत्तक घेतले. मात्र रशिया आणि युक्रेनमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र भीतीचे वातावरण होते. अमेरिकन नागरिकांना तातडीने युक्रेन सोडण्याचे आणि अमेरिकेला परत येण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र या जोडप्याने दत्तक घेतलेल्या मुलाला व्हिसा मिळू न शकल्याने हे जोडपे युक्रेनमध्येच अडकले होते, आम्ही दत्तक घेतलेल्या मुलाला न्युमोनिया झाला आहे, त्याला उपचाराची तातडीने गरज आहे, त्यामुळे त्याच्यासह आम्हाला तातडीने व्हिसा उपलब्ध करून द्यावा अशी विनंती हे जोडपे वारंवार अमेरिकन सरकारकडे करत होते.

मुलगा रुस्लानसह परतले अमेरिकेत

या जोडप्याने दत्तक घेतलेल्या मुलाला व्हिसा मिळावा यासाठी अनेकदा अमेरिकन दुतावासाकडे अर्ज केला. मात्र तरी देखील त्यांना अपयश आले. मुलाची प्रकृती गंभीर बनली होती. अशा कठीण परिस्थितही या जोडप्याने प्रयत्न सुरूच होते. अखेर अनेक अडथळ्यांची शर्यत पार केल्यानंतर या जोडप्याच्या प्रयत्नाला यश आले. संबंधित मुलाला व्हिसा जारी करण्यात आला व हे जोडपे आपला मुलगा रुस्लानसह अमेरिकेत परतले. आता या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रुस्लानची प्रकृती स्थिर

याबाबत या जोडप्याने ‘फॉक्स 4’ या वृत्त वाहिनिला माहिती देताना सांगितले की, हा प्रवास अतिशय खडतर असा होता. आमच्या दत्तक मुलाला व्हिसा मिळत नसल्याने आम्ही त्याला तिथेच सोडून अमेरिकेमध्ये परत येऊ शकत नव्हतो. त्याला निमोनिया झाला होता. त्याला तातडीने वैद्यकीय मदत मिळणे अत्यावश्यक होते. आम्ही त्यासाठी सातत्याने अमेरिक दूतावासाकडे पाठपुरावा केला. आमच्या मदतीला देव धावून आला आणि आम्ही अमेरिकेत परत आलो. या मुलावर सध्या एका चांगल्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती यो जोडप्याने दिली आहे.

संबंधित बातम्या

रेस्टॉरंटमध्ये ‘या’ मुलीनं घातला राडा, काय होतं पुढे? पाहा Viral video

…म्हणून होत नाही भाऊ आणि बहिणीची भेट; Viral झालाय ‘Salute to Indian army’ Video

दोन चिमुरड्यांना भीषण आगीतून वाचवण्याचा थरार; पाहा, अंगावर काटा आणणारा ‘हा’ Viral video

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.