Video : पोपटाची चोच अन् राजाचं तोंड सारखंच!, किंमत तर लाखांच्या घरात, सांगलीच्या ‘राजा’चा मंत्री एकनाथ शिंदेकडून सत्कार

Video : पोपटाची चोच अन् राजाचं तोंड सारखंच!, किंमत तर लाखांच्या घरात, सांगलीच्या 'राजा'चा मंत्री एकनाथ शिंदेकडून सत्कार

या अनोख्या बकऱ्यासोबत फोटो काढण्याचा अनेकांना मोह आवरला नाही. त्याच्या फोटो काढण्यासाठी ग्रामस्थांनी आणि पोलिसांनी गर्दी केली होती.

शंकर देवकुळे

| Edited By: आयेशा सय्यद

May 12, 2022 | 7:22 PM

सांगली : बकऱ्याची लाखाच्या घरातल्या किमती आपल्यासाठी नवीन नाहीत. त्यांची लाखात लागलेली बोली आपण पाहिली आहे. पण सध्या सोशल मीडियावर सांगलीच्या राजाची (Raja Bakara-Sangli) चर्चा आहे ती त्याच्या किमतीसोबतच त्याच्या तोंडाच्या आकारामुळे. कारण या राजाच्या तोंडाचा आकार हा पोपटाच्या चोचीसारखा आहे. त्यामुळे हा बकरा चांगलाच चर्चेत आला आहे. त्याची किंमत आहे 31 लाख रूपये… या राजाचा मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला आहे. याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा (Viral Video) आहे.

माडग्याळ जातीचा बकरी ही जगप्रसिद्ध आहे. या बकरीला लाखो रुपयांची किंमत येते. याचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी पोपटासारखी चोच असणारा हा बकरा अतिशय देखणा सुंदर दिसतो. या बकऱ्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते.

मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार

तुम्ही रागू सारखी चोच असणारा बकरा कधी पहिला आहे का? तर पहाच तब्बल 31 लाखाला मागितलेल्या या पोपट चोचीचा असलेल्या राजा बकऱ्याचा सत्कार मंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

बकऱ्या सोबत फोटो काढण्यासाठी गर्दी

या अनोख्या बकऱ्यासोबत फोटो काढण्याचा अनेकांना मोह आवरला नाही. त्याच्या फोटो काढण्यासाठी ग्रामस्थांनी आणि पोलिसांनी गर्दी केली होती.

हे सुद्धा वाचा

माडग्याळ जातीचा हा बकरा. रागु चोचीचा हा बकरा आहे. या बकर्याला राजा नाव आहे. हा अवघ्या 2 महिने 8 दिवसाचा बकरा आहे. याला तब्बल 31 लाखाला मागितला आहे. तर याच्या आज्जीला तब्बल दीड कोटीला मागितला असल्याचे मालकाने सांगितले. तर याचा सत्कार मंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्कार केला. आटपाडी मध्ये कामगार मेळाव्यात या बकर्याला पाहण्यासाठी गर्दी झाली होती.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें