AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Metro Viral Video : आपल्या प्रसिद्ध आजोबांचा आवाज मेट्रोत ऐकताच नातवाचा आनंद गगनात मावेना; ‘दादू’ म्हणत ओरडला

शम्मी नारंग आपल्या नातवाला रूशानला पहिल्यांदा दिल्ली मेट्रोने प्रवासासाठी घेऊन गेले होते. मेट्रोची अनाउन्समेंट सुरू होताच रूशानने आजोबांचा आवाज लगेच ओळखला. या क्षणाचा इमोशनल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Delhi Metro Viral Video : आपल्या प्रसिद्ध आजोबांचा आवाज मेट्रोत ऐकताच नातवाचा आनंद गगनात मावेना; ‘दादू’ म्हणत ओरडला
delhi viral video Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 05, 2026 | 3:31 PM
Share

आजूबाजूचा परिसर कितीही अनोळखी असला तरी त्यातही आपण आपल्या माणसांना सहज ओळखू शकतो. त्यातही मोठ्या माणसांपेक्षा लहान मुले आपल्या माणसांचा विशेषत: आजी आजोबांचा सहवास सहज ओळखतात.दिल्ली मेट्रोमध्ये असंच काहीसं घडलं आहे. प्रसिद्ध न्यूज अँकर आणि दिल्ली मेट्रो स्थानकांच्या अनाउन्समेटसाठी दिलेला आवाज म्हणजेच शम्मी नारंग .नारंग यांचा नातू त्याच्या आजोबांसोबत पहिल्यांदाच मेट्रोने प्रवास करत होता. त्याक्षणी अनाउन्समेट सुरू झाली,आणि त्यांचा नातू दादू म्हणून जोरात ओरडला? बाकीचे मेट्रो प्रवासी थक्क होऊन त्या मुलाकडे पाहू लागले. या क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओने चाहत्यांचे मन जिंकले आहे.

शम्मी नारंग यांनी आपल्या नातवाला रूशानला त्याच्या पहिल्या दिल्ली मेट्रो प्रवासासाठी नेलं होतं. रुशानसाठी मेट्रो स्टेशन,प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधला प्रवास हे सागळचं नवीन होतं. कुटुंबासोबत तो मेट्रोमध्यो बसला असताना नेक्स्ट स्टेशनची अनाउन्समेट सुरू झाली.

रूशानने तो आवाज चटकन ओळखला आणि त्याने आपली नजर लगेच आपल्या दादूंकडे म्हणजेच शम्मी यांच्याकडे वळवले.नेहमी घरात ऐकू येणारा आवाज त्याला असा अचानक सार्वजनिक ठिकाणी ऐकू आल्यामुळे त्याला प्रचंड आनंद झाला. आनंदाच्या भरात त्याच्या तोंडून मोठ्याने दादू उच्चार निघाला. आजूबाजूची लोक थक्क होऊन त्याच्याकडे बघत बसली.कोणाच्याच लक्षात आले नव्हते की आपल्यासोबत शम्मी नारंग प्रवास करत आहेत. पण जेव्हा रूशान ओरडला तेव्हा त्यांचे लक्ष शम्मी नारंग यांच्याकडे गेले आणि लोक थक्क होऊन बघत बसली.

शम्मी नारंग हे दुरदर्शनचे माजी अँकर आहेत. तसेच त्यांचा आवाज अनेक वर्षांपासून दिल्ली मेट्रोचा आवाज आहे. मेट्रोमध्ये स्टेशनची अनाउन्समेट ऐकताना हा आवाज लाखो प्रवाशांच्या कानावर पडतो.

शम्मी नारंग यांनी या क्षणाचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओला त्यांनी एक सुंदर कॅप्शनही दिलंय, ते म्हणतात की ” या मेट्रोमधून ते काय आयुष्यभर प्रवास तर करू शकणार नाहीत पण त्यांचा आवाज एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकजे प्रवास करत राहिल. याचा त्यांना अभिमान आहे. त्यांनी हा क्षण त्यांच्या कुटुंबासाठी खास असल्याचं देखील म्हटल आहे.

Follow Us
'राऊतांना मोदींवर टीका करण्याचा अधिकार नाही', परिणय फुकेंचं वक्तव्य
Video :
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शहाजी बापू पाटलांचा यू-टर्न
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शहाजी बापू पाटलांचा यू-टर्न, विरोध मागे घेऊन प्रचारात सक्रिय
Video: ट्रिपल इंजिन सरकार विरोधात टोळीयुद्ध सुरू - हर्षवर्धन सपकाळ
Video: ट्रिपल इंजिन सरकार विरोधात टोळीयुद्ध सुरू - हर्षवर्धन सपकाळ
8 तास ड्युटी, अन्...; पोलिसांच्या कामाच्या तासांवर राऊतांच फडणवीसांना
Sanjay Raut : 8 तास ड्युटी, अन् 16 तास...; पोलिसांच्या कामाच्या तासांवर संजय राऊतांचं थेट मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
वर्धा पदवीधर मतदार संघात मविआला मोठा झटका; त्या नेत्याची बंडखोरी करत..
MVA : वर्धा पदवीधर मतदार संघात मविआला मोठा झटका; त्या नेत्याची बंडखोरी करत थेट मैदानात एंट्री
10 बाटल्या भरल्या अन् खळबळ उडाली; विहिरीतून पेट्रोलसदृश ज्वलनशील....
Sangli : 10 बाटल्या भरल्या अन् खळबळ उडाली; विहिरीतून पेट्रोलसदृश ज्वलनशील पदार्थ, व्हिडिओ बघाच
ज्ञानेश कुमारांना दिलासा की पुढे संकट?; सुप्रीम कोर्टाने अंतरिम कारवाई
Gyanesh Kumar Hearing Update : ज्ञानेश कुमारांना दिलासा की पुढे संकट?; सुप्रीम कोर्टाने अंतरिम कारवाई नाकारली, कारण...
लाज आम्हाला नाही, तर...; चित्रा वाघ यांचा रोहित पवारांवर थेट पलटवार
Chitra Wagh vs Rohit Pawar : लाज आम्हाला नाही, तर...; चित्रा वाघ यांचा रोहित पवारांवर थेट पलटवार
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच...
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच दाखवला; रोहित पवारांवर गंभीर आरोप
नवरात्रीचा खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 18 लाख...
इतर खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 11 लाख देण्याचा निर्णय, भाजप नेत्याचा पुढाकार