AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथे घरात पाळतात खतरनाक साप; ऐकून अंगावर येईल काटा..

शेटफळ हे महाराष्ट्रातील एक अद्भुत गाव आहे जिथे लोक कोब्रा सापांसोबत शांततेने राहतात. ते सापांना देव मानतात आणि पिढ्यानपिढ्या ही परंपरा जपतात. सापांची पूजा केली जाते आणि त्यांना कुटुंबाचा सदस्य मानले जाते. पर्यटकांना आकर्षित करणारे हे गाव, सापांच्या संवर्धनाचेही एक उत्तम उदाहरण आहे.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथे घरात पाळतात खतरनाक साप; ऐकून अंगावर येईल काटा..
असं एक गाव जिथे घरात पाळतात सापImage Credit source: social media
| Updated on: Jul 29, 2025 | 2:13 PM
Share

आपल्या देशात, राज्यात अशी अनेक गावं आहे, जिथली संस्कृति, परंपरा या देशातील तर भागांपेक्षा खूप वेगळ्या आहेत. त्यापैकीच महाराष्ट्रातलं एक गाव चर्चेत आहे, ते म्हणजे शेटफळ हे गाव (Shetpal Village). ते एका रहस्याप्रमाणेच आहे. कारण इथल्या गावातील घरात लोकं कुत्रा, मांजर पाळत नाहीत, तर ते चक्क खतरनाक साप पाळतात साप..हो तुम्ही अगदी बरोब्बर वाचलं आहे.

या गावातील लहान पोरं खेळण्यांसोबत नव्हे तर जिवंत सांपासोबत खेळतात, कारण् त्यांच्याकडे घरात साप पाळले जातात. तेही खतरनाक नाग, कोब्रा साप.

सापांचं गाव

शेटफळ हे गाव सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात असन तिथले लोकं खतरनाक अशा कोब्रा सापांसोबत बिनधास्त जगतात, वावरताही. तिथल्या जवळपास प्रत्येक घरात तुम्हाला साप दिसतील. आणि हे साप फक्त घरांतच नव्हे तर शेतात, झाडांवर आणि बेडरूमच्या आतही आढळतील. गावातले लोक या सापांना बिलकूल घापरत नाहीत, उलट त्याच सापांसोबत एकाच छताखाली राहतात, शांतपणे जगतात, त्यांच्याशी खेळतात आणि त्यांना दूधही पाजतात. शेटफळमध्ये कोब्रा सापांसाठी एक खास ठिकाण आहे.

सापांशी खास नातं

शेटफळ गावातील लोक हे कोब्राला, सापांना भगवान शिवाचे प्रतीक मानतात, म्हणून ते सापांची पूजा करतात आणि त्यांना त्यांच्या कुटुंबातील एक सद्सय मानतात. गावात अशी अनेक मंदिरे आहेत जिथे सापांची पूजा केली जाते. गावातील लोकांच्या सांगण्यानुसार, त्यांच्या पूर्वजांनी साप पाळण्यास सुरुवात केली. तेव्हापासून ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. साप कसे पकडायचे आणि ते कसे पाळायचे हे गावकऱ्यांना चांगलंच माहित आहे. एवढंच नव्हे तर सापांना कसं हाताळायचे हे इथले लोकं अगदी लहानपणीच शिकतात.

सापांच्या दंशाची भीती नाही

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, इतक्या सापांमध्ये राहूनही गावातील लोकांना साप चावण्याची, त्यांच्या दंशाची भीती वाटत नाही. ते म्हणतात की साप त्यांना कधीही चावत नाहीत. साप हे माणसांसारखेच प्राणी आहेत आणि त्यांनाही प्रेम तसेच आदरही हवा असतो, असा त्यांचा विश्वास आहे. .

पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र

शेटफळ गाव आता पर्यटकांसाठीही आकर्षणाचे केंद्र बनले आहे. हे गाव पाहण्यासाठी लोक दूरदूरून येतात. गावकरी पर्यटकांना सापांबद्दल सांगतात आणि सापांना कसे हाताळायचे हे देखील शिकवतात.

आव्हाने आणि संवर्धन

मात्र असं असलं तरी शेटफळ गावात साप पाळणे सोपे नाही. गावकऱ्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. साप पाळण्यासाठी विशेष प्रकारचे अन्न आवश्यक असते. याशिवाय सापांना आजारांपासून वाचवणे हे देखील एक मोठे आव्हान आहे. या गावाचे संवर्धन करण्यासाठी सरकारही प्रयत्न करत आहे. सरकारने हे गाव पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याची योजना आखली आहे. यासोबतच, सरकार गावकऱ्यांना सापांच्या संवर्धनासाठी प्रशिक्षणही देत आहे.

निसर्गाशी सुसंवाद

शेटफळ गाव हे भारतीय संस्कृतीचे एक अद्वितीय उदाहरण आहे. हे गाव आपल्याला निसर्गाशी एकरूप होऊन कसे जगता येईल हे शिकवते. आपण सर्व सजीव प्राण्यांबद्दल आदर आणि प्रेम बाळगला पाहिजे,हेदेखील हे गाव आपल्याला शिकवतं.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.