चमत्कार! ‘या’ कोंबडीला 2 नव्हे तर चक्क 4 पाय, Video पाहून हैराण व्हाल
सोशल मीडियावर दररोज शेकडो व्हिडिओ व्हायरल होत असतात. आताही एका कोंबडीचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये या कोंबडीला 2 ऐवजी 4 पाय असल्याचे दिसत आहे.

सोशल मीडियावर दररोज शेकडो व्हिडिओ व्हायरल होत असतात. आताही एका कोंबडीचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये या कोंबडीला 2 ऐवजी 4 पाय असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. मात्र काही लोकांनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. या व्हिडिओबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
कोंबडीचा व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने हातात पांढऱ्या रंगाची कोंबडी पकडलेली आहे. या कोंबडीला दोन नव्हे तर चार पाय आहेत. व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर @ruko_bhaiiii नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ही कोंबडी सुरुवातीला पाहिल्यास सामान्य दिसते, मात्र तिचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यास तिला 4 पाय असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
कोंबडीला 4 पाय
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा व्यक्ती कोंबडीचे पाय एक-एक करून मोजत आहे. तसेच तो कोंबडीचा प्रत्येक पाय वेगवेगळ्या कोनातून दाखवतो. त्यामुळे या कोंबडीला खरच 4 पाय असल्याचे स्पष्ट होते. कोंबडीला 4 पाय असणे सामान्य नाही, मात्र अनुवांशिक बदलामुळे या कोंबडीला 4 पास आले असण्याची शक्यता आहे. ही एक दुर्मिळ कोंबडी आहे.
View this post on Instagram
पॉलीमेलियाचे प्रकरण
समोर आलेल्या माहितीनुसार, ही कोंबडी तयार होत असताना शरीरात अतिरिक्त अवयव तयार होतात. याला पॉलीमेलिया म्हणतात. या स्थितीत शरीराच्या काही भागात एक किंवा अधिक अवयव विकसित होतात. बऱ्याचदा एक अवयव पूर्णपणे विकसित झालेला नसतो, त्यामुळे तो दुसऱ्या अवयवासोबत जोडला जातो. त्यामुळे आपल्याला शरीरात अतिरिक्त अवयव दिसतात. मात्र हे अतिरिक्त अवयव कधीकधी कामही करत नाहीत. ही स्थिती मानवांमध्येही पहायला मिळते.
लोक म्हणाले – चमत्कार
दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका व्यक्तीने म्हटले की, एक्ट्रा लेगपीसची सोय झाली. तर काही लोकांनी याला निसर्गाचा चमत्कार म्हटले आहे.
