वराच्या कुटुंबाने छापली अशी लग्नपत्रिका, वाचताच लोक प्रचंड घाबरले; असं काय लिहिलंय?
एक मुस्लिम कुटुंबाच्या लग्नाचं कार्ड सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. या कार्डमध्ये "आमद के मुंतज़िर" या स्तंभात मृतांची नावे समाविष्ट करण्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. कार्डमध्ये नवरदेवाच्या काका, काकू आणि इतर नातेवाईकांसोबतच "मर्हूम नुरूल हक" सारखी नावेही समाविष्ट आहेत.

सध्या लग्न सराईचे दिवस सुरू आहेत. त्यासाठी लग्नाचे हॉल मिळणंही मुश्किल झालं आहे. ठिकठिकाणी सनईचौघड्यांचे सूर कानावर येत आहेत. गेल्यावर्षी म्हणजे दोन महिन्यांपूर्वी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये अनेक लग्न झाले आहेत. यावर्षी देखील जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात लग्नाचं जोरदार वातावरण पाहायला मिळत आहे. लग्नात लग्नपत्रिकांना तर खूप महत्त्व असतं. त्यामुळे हल्ली लोक लग्नपत्रिकेवरही प्रचंड खर्च करत असतात. हटके आणि सुंदर लग्नपत्रिका तयार करण्यावर त्यांचा कल असतो. इतरांपेक्षा आपली लग्नपत्रिका कशी वेगळी आहे, हे ठसवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो.
अशीच एक लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या लग्नपत्रिकेत असं काही लिहिलंय की त्यामुळे लोक पत्रिका वाचून धस्तावतील. हे अनोखं कार्ड आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलं आहे. मुस्लिम कुटुंबातील हे लग्न आहे. या लग्नात पाहुण्यारावळ्यांची नावे आहेत. पण यातील काही नावांनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ती नावे पाहून अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
पाहुण्यांची नावे
हे लग्नाचं कार्ड सध्या Faiq Ateeq Kidwai या फेसबुक पेजवर व्हायरल झालं आहे. लग्नपत्रिकेत लग्नाची तारीख 9 फेब्रुवारी 2025 लिहिली आहे. जयपूरमध्ये हे लग्न होणार आहे. या लग्नपत्रिकेतील ‘आमद के मुँतज़िर’ या शब्दांवर लोकांचं लक्ष गेलं आहे. हिंदीत त्याचा अर्थ आहे ‘दर्शनाभिलाषी’ असा होतो. पाहुणे म्हणून येणाऱ्या लोकांचा या लग्नपत्रिकेत उल्लेख आहे. या
कार्डावर मृतकांचे नाव
आम्ही पाहुण्यांच्या येण्याची प्रतिक्षा करत आहोत, असं लिहून त्याखाली नवरदेवाचे काका, काकू आणि लहान मुलांची नावे लिहिली आहेत. पण त्यानंतर खाली मृतकांची नावे लिहिल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. पण या लग्नाच्या पत्रिकेत ‘दर्शनाभिलाषी’ या ठिकाणी मृतकांचे नाव लिहिले गेले आहे. म्हणजे लग्नपत्रिकेत मरण पावलेले लोकांची नावे अशी दिली आहेत – ‘मर्हूम नुरूल हक’, ‘मर्हूम लालू हक’, ‘मर्हूम बाबू हक’, ‘मर्हूम एजाज हक’. त्यानंतर इतर लोकांचे नाव दिले आहे. लग्नपत्रिकेत थेट मृतकांची नावे दर्शनाभिलाषी असं लिहिल्याने लोक पत्रिका वाचून घाबरूनच गेले आहेत. सोशल मीडियावर तर ही नावे वाचून लोक प्रचंड कमेंट करत आहेत. मृतक लोक कसे काय दर्शन देतील? असा सवाल लोक करत आहेत.
लग्न जयपूरच्या करबला मैदानात होणार आहे आणि कार्डावर 8 आणि 9 फेब्रुवारीच्या कार्यक्रमाची माहिती आहे. हे कार्ड सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊन 600 पेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे, तर 100 पेक्षा जास्त लोकांनी यावर कमेंट केली आहे. एक व्यक्तीने लिहिले की, जोधपूर-जयपूर भागात असे कार्ड सामान्य आहेत.