5

Video | खेळण्याची अजब तऱ्हा, लहान मुलाने जिवंत सापाला हातात पकडले, नंतर…, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सध्या मात्र काहीसा वेगळा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये (Social Media) एका छोट्या मुलाजवळ भलामोठा साप देण्यात आलाय. हा साप जिवंत (Snake) असून त्याला घेऊन मुलगा मजेत हसत आहे. हा व्हिडिओ पाहून काही नेटकरी संतापले आहेत.

Video | खेळण्याची अजब तऱ्हा, लहान मुलाने जिवंत सापाला हातात पकडले, नंतर..., व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
BOY WITH SNAKE
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 7:09 AM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण हरखून जातो. कधीकधी काही व्हिडीओंना पाहून तर आपण थक्क होऊन जातो. प्राणी आणि पक्ष्यांचे व्हिडीओ तर लोकांना मोठ्या प्रमाणात आवडतात. अशा प्रकारचे मजेदार व्हिडीओ नेटकरी उत्स्फूर्तपणे शेअर करतात. तसेच अशा व्हिडीओंवर लोक भरभरून प्रतिक्रिया देतात. सध्या मात्र काहीसा वेगळा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये (Social Media) एका छोट्या मुलाजवळ भलामोठा साप देण्यात आलाय. हा साप जिवंत (Snake) असून त्याला घेऊन मुलगा मजेत हसत आहे. हा व्हिडिओ पाहून काही नेटकरी संतापले आहेत. हा व्हिडीओ  snake._.world या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड करण्यात आला आहे.

छोटासा मुलगा सापासोबत खेळतोय 

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र या व्हिडीओमध्ये एक छोटा मुलगा दिसत आहे. या मुलाच्या हातात एक हिरवा साप आहे. सापासोबत व्हिडीओतील मुलगा खेळताना दिसतोय. तसेच तो आनंदात हसतदेखील आहे. एखाद्या प्राणिसंग्रहालयातील हा व्हिडीओ असावा असा अंदाज लावला जातोय. हा मुलगा खेळत असताना समोर कोणीतरी त्याचा व्हिडीओ शूट करत आहेत. हा सर्व प्रकार पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी मुलगा निरागसपणे खेळत असल्याचे म्हटले आहे. तर काही नेटकऱ्यांनी मुलाला सापासोबत खेळायला देणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

पाहा व्हिडीओ :

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. लहान मुलांना साप खेळायला देणे चुकीचे आहे, असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने साप चावू शकतो, असे म्हटलेय. साप विषारी नसला तरी लहान मुलांना खेळायला साप देत नसतात, असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. तर काही लोकांनी मुलाच्या पालकांना दूषणे दिली आहेत.

इतर बातम्या :

अंतराळात सापडली रहस्यमय वस्तू; वैज्ञानिक म्हणतायत हे भयावह, आधी कधीही पाहिलं नाही!

Kids Video : ‘हा’ चिमुरडा शिडीवरून असा काही उतरतो… यूझर्स म्हणतायत, याला ऑलिम्पिकच्या तयारीला पाठवा

वधूच्या प्रवेशापूर्वीच रडू येईल, वरानं आधीच केली होती भविष्यवाणी; काय घडलं पुढे? पाहा Viral Video

Non Stop LIVE Update
AC Local वर दगडफेक, कांदिवली ते बोरिवली स्थानकादरम्यान नेमकं काय घडलं?
AC Local वर दगडफेक, कांदिवली ते बोरिवली स्थानकादरम्यान नेमकं काय घडलं?
भावी मुख्यमंत्री राज ठाकरे? फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले...
भावी मुख्यमंत्री राज ठाकरे? फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले...
इंडिया आघाडीची रॅली म्हणजे टोपी लावण्याचे काम? दीपक केसरकर म्हणाले...
इंडिया आघाडीची रॅली म्हणजे टोपी लावण्याचे काम? दीपक केसरकर म्हणाले...
'सैन्य कशाला हवं, ...तरी राऊत पळून जातील', कुणी उडवली राऊतांची खिल्ली?
'सैन्य कशाला हवं, ...तरी राऊत पळून जातील', कुणी उडवली राऊतांची खिल्ली?
'संजय राऊत आदित्य ठाकरेंना चावले की काय?', कुणी केला खोचक सवाल?
'संजय राऊत आदित्य ठाकरेंना चावले की काय?', कुणी केला खोचक सवाल?
भुजबळांचा जरांगे यांना सल्ला; 'मला एकट्याला टार्गेट करण्यापेक्षा...'
भुजबळांचा जरांगे यांना सल्ला; 'मला एकट्याला टार्गेट करण्यापेक्षा...'
'त्या' दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांचा उद्योगमंत्र्यांना खोचक सवाल
'त्या' दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांचा उद्योगमंत्र्यांना खोचक सवाल
'ढेकणांना मारण्यासाठी लष्कराची गरज नसते', राऊतांवर कुणाचा निशाणा?
'ढेकणांना मारण्यासाठी लष्कराची गरज नसते', राऊतांवर कुणाचा निशाणा?
आदित्य ठाकरे यांना भाजपचा खोचक सवाल, 'अफझलखान तुमचा पाहुणा लागतो का?'
आदित्य ठाकरे यांना भाजपचा खोचक सवाल, 'अफझलखान तुमचा पाहुणा लागतो का?'
शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरून राऊत यांचं आव्हान काय? थेट म्हणाले...
शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरून राऊत यांचं आव्हान काय? थेट म्हणाले...