AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Liquor Smuggling : दारु तस्करीसाठी खतरनाक जुगाड, सिलेंडरचा असा वापर पाहून तुम्ही हैराण व्हाल

LPG Cylinder Tricks : दारु, सोने तस्करीसाठी काय डोकेलिटी लढवली जाते हे आपण अनेकदा पाहतो. विमानतळावर तर सोने, कोकेन, अफू अशा अंमली पदार्थांच्या तस्करीच्या अनेक घटना उघडकीस येतात. तर दुसरीकडे या पठ्ठ्याचा खतरनाक जुगाड पाहून तुम्ही हैराण व्हाल.

Liquor Smuggling : दारु तस्करीसाठी खतरनाक जुगाड, सिलेंडरचा असा वापर पाहून तुम्ही हैराण व्हाल
दारु तस्करीसाठी काय हा जुगाडImage Credit source: गुगल
| Updated on: Jun 27, 2025 | 8:18 AM
Share

सोने, अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी विमानतळावर केलेले अनेक जुगाड आपण टीव्ही पाहतो. बातम्यातून वाचतो. विमानतळावर तर सोने, कोकेन, अफू अशा अंमली पदार्थांच्या तस्करीच्या अनेक घटना उघडकीस येतात. बिहारमध्ये दारुबंदी आहे. म्हणजे दारू मिळत नाही असे नाही. चोरून का होईना दारू मिळतेच. दारूची तस्करी करण्यात येते. दारुच्या तस्करीसाठी काही तरी युक्ती वापरली जाते. या पठ्ठ्याचा खतरनाक जुगाड पाहून तुम्ही हैराण व्हाल.

एलपीजी सिलेंडरमध्ये दारुची तस्करी

बिहारमध्ये दारुबंदी आहे. गोपालगंजमध्ये एका तस्कराने LPG सिलेंडरमध्ये दारुची तस्करी केली. ही घटना कुचायकोट येथील मैरवा पूल जवळ घडली. पोलिसांनी सिलेंडरमधून 15 लिटर परदेशी दारुच्या बॉटल जप्त केल्या. हा दारू तस्करी करून उत्तर प्रदेशातून (UP) बिहारमध्ये आणण्यात येत होती. पोलिसांना खबऱ्याकडून या प्रकाराची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आणि तस्कराला अटक केली.

दारूच्या तस्करीसाठी खतरनाक जुगाड

कायद्याने बिहारमध्ये दारूबंदी आहे. पण दारू विक्रेते नवनवीन जुगाड करतातच. ते ग्राहकांपर्यंत दारू पोहचवण्यासाठी वेगवेगळे ट्रिक्स शोधतात. पोलिसांनी सांगितल्यानुसार, तस्कर हे उत्तर प्रदेशातून LPG सिलेंडरमध्ये दारू भरून बिहारमध्ये आणत होते. कुचायकोट येथील मैरवा पुलाजवळ या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली. तस्करांनी सिलेंडरमध्ये लपवलेली 15 लिटर परदेशी दारू पोलिसांनी ताब्यात घेतली. दारुच्या तस्करीसाठीचा हा जुगाड पाहून पोलीस ही अवाक झाले.

पोलिसांनी तस्कराला केली अटक

पोलिसांनी सुरज नावाच्या तस्कराला अटक केली आहे. तो उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील तमकुहीराज पोलीस ठाण्यातंर्गत हरिहरपूर गावातील रहिवाशी आहे. तो गेल्या काही दिवसांपासून सिलेंडरमध्ये दारुच्या छोट्या बाटल्या टाकून बिहारमध्ये आणत होता. घरगुती गॅस सिलेंडर असल्याने त्याच्यावर कुणाचा संशय गेला नाही. त्यामुळे त्याला सहज धुळफेक करता आली. कधी अँम्बुलन्स, कधी स्कॉर्पियो तर कधी ट्रकांमध्ये विविध वस्तू आणत तस्करी करण्यात येत असल्याचे यापूर्वी दिसून आले होते. आता तर या तस्कराने हद्द केली आहे. गेल्या महिन्याच्या अखेरीस पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.