VIDEO : काचेच्या बाटलीवर बॅलन्स, महिलेचा थरारक स्टंट, व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच

सध्या असाच एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. एक महिला काचेच्या बाटलीवर (Woman stunt on bottle) उभी राहून आपला तोल सांभाळत आहे.

VIDEO : काचेच्या बाटलीवर बॅलन्स, महिलेचा थरारक स्टंट, व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
woman stand on bottle

मुंबई : जगभरात अनेक लोक असे आहेत ज्यांच्याकडे पाहिल्यावर जगात टॅलेंटची कमी नाही हे दिसून येतं. आपल्या टॅलेंटच्या जीवावर जगाचं लक्ष वेधून घेण्याची ताकद या कलाकारांकडे असतं. अनेकांच्या कलेला वाव न मिळाल्याने ती दबून जाते. पण सध्याच्या सोशल मीडियाच्या (Social media) जगात एक असा प्लॅटफॉर्म तयार झाला आहे, ज्यासाठी तुम्हाला फक्त तुमची कला सादर करायची आहे, प्रसिद्धी आपोआप होईल. सोशल मीडियामुळे अनेकजण रातोरात स्टार बनले आहेत. (Social media trending video Woman stunt on bottle)

सध्या असाच एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. एक महिला काचेच्या बाटलीवर (Woman stunt on bottle) उभी राहून आपला तोल सांभाळत आहे. एका पाठोपाठ एका बाटलीवर उभं राहून ही महिला एक एक टप्पा पार करत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. असे काही व्हिडीओ असतात जे पुन्हा पुन्हा पाहू वाटतात. असाच हा व्हिडीओ असून, लोक या व्हिडीओचं आणि त्या महिलेचं कौतुक करत आहेत. संपूर्ण शरिराचा भार बाटलीवर ठेवून ही महिला बॅलन्स करत आहे. शिवाय बाटलींचे टप्पे पार करुन, शरिराचा तोल सावरत आहे.

पाहा व्हिडीओ 


सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर केला जात आहे. ट्विटरवर हा व्हिडीओ ‘Hold My Beer’ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे.

संबंधित बातम्या    

VIDEO | पाळीव सिंहाचा चिमुकल्यावर हल्ला, थरारक CCTV व्हिडीओ, मालकावर गुन्हा

तरुणीने सोनू सूदला केली बॉयफ्रेण्ड देण्याची विनंती; काही क्षणांतच तीची इच्छा पूर्णही झाली

(Social media trending video Woman stunt on bottle)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI