फळ्याकडे न पाहता कलाकारानं साकारलं हनुमानाचं चित्र! पाहा Viral video

फळ्याकडे न पाहता कलाकारानं साकारलं हनुमानाचं चित्र! पाहा Viral video
न पाहता फलकावर साकारले हनुमानाचे छायाचित्र
Image Credit source: Youtube

Artist video : विविध कलाकार आणि त्यांच्या कलांचे व्हिडिओ (Video) आपण सोशल मीडियावर (Social media) नेहमीच पाहत असतो. अशांचे व्हिडिओ लवकर व्हायरल (Viral) होतात. असाच एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झालाय, ज्यात कलाकाराने कलाकृती तर साकारली आहे, मात्र त्याकडे न पाहता...

प्रदीप गरड

|

Mar 17, 2022 | 8:30 AM

Artist video : विविध कलाकार आणि त्यांच्या कलांचे व्हिडिओ (Video) आपण सोशल मीडियावर (Social media) नेहमीच पाहत असतो. अशांचे व्हिडिओ लवकर व्हायरल (Viral) होतात. कारण त्यात इतर व्हिडिओंपेक्षा वेगळे काहीतरी असते. कलाकारांची कलाकारी, जसे कल्पकतेने रांगोळी काढणे, चित्र रेखाटणे, एखाद्या झाडामध्ये शिल्प साकारणे, एखादी छोटी पण अत्यंत अवघड अशी कलाकृती सादर करणे, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे तीही आकर्षक असे एक ना अनेक व्हिडिओ आपण पाहत असतो. काही कलाकार तर इतके कौशल्यपूर्ण असतात, की न पाहताही ते अशा कलाकृती साकारू शकतात. होय… असाच एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झालाय, ज्यात कलाकाराने कलाकृती तर साकारली आहे, मात्र त्याकडे न पाहता…

साकारतो हनुमानाचे चित्र

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक चित्रकार दिसत आहे. हा चित्रकार आपल्याकडे तोंड करून उभा आहे. म्हणजेच कॅमेऱ्याच्या समोर आहे. तर त्याच्या पाठीमागे एक फलक दिसत आहे. हातात खडू आहे. मग एक संपूर्ण खडू दोन हातांनी पकडून त्याला बरोब्बर मध्यभागी धरून त्याचे तुकडे करतो. त्यानंतर दोन्ही हात वर करून आणि समोर पाहून तो आपल्या पाठीमागे असलेल्या फलकावर हनुमानाचे चित्र काढतो.

यूट्यूबवर अपलोड

कलाकार चित्र काढत असताना अत्यंत सफाईदारपणे काढतो. त्यातून त्याचा सराव दिसून येतो. हा व्हिडिओ यूझर्सना अत्यंत आवडला आहे. यूट्यूबवर चंदन आर्ट अकॅडमी (CHANDAN ART ACADEMY) या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. 15 मार्चला अपलोड केलेल्या या व्हिडिओला एका दिवसातच 69 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर ‘jai shree ram‘ असे कॅप्शन व्हिडिओला देण्यात आले आहे.

आणखी वाचा :

Video : मगरही होते कुणाचीतरी शिकार! पाहा ‘या’ दोन प्राण्यांमधला जीवन-मरणाचा सामना

GoogleMapsच्या आधी ‘असे’ शोधले जायचे रस्ते, Funny video पाहून म्हणाल, क्या टायमिंग है!

तुम्हाला जमेल का ‘असं’ करायला? माकडाचा ‘हा’ Funny video viral

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें