ऑस्कर ट्रॉफीमध्ये कोणाची असते मूर्ती; या ट्रॉफीसाठी कलाकार घेतात प्रचंड मेहनत

वैजंता गोगावले, Tv9 मराठी

|

Updated on: Jul 07, 2021 | 8:41 PM

या अतिप्रतिष्ठित पुरस्काराची सुरुवात अमेरिकेच्या अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने केली. पहिला ऑस्कर पुरस्कार सोहळा 16 मे 1929 रोजी आयोजित करण्यात आला होता. (Whose idol is in the Oscar trophy; The artists work hard for this trophy)

ऑस्कर ट्रॉफीमध्ये कोणाची असते मूर्ती; या ट्रॉफीसाठी कलाकार घेतात प्रचंड मेहनत
ऑस्कर ट्रॉफीमध्ये कोणाची असते मूर्ती; या ट्रॉफीसाठी कलाकार घेतात प्रचंड मेहनत

न्यूयॉर्क : ऑस्कर ट्रॉफी म्हणजे हॉलिवूड इंडस्ट्रीत देण्यात येणारा सन्मान. हा सन्मान मिळावा, असे प्रत्येक चित्रपट निर्माता आणि अभिनेते-अभिनेत्रींचे स्वप्न असते. ही गोल्डन ट्रॉफी मिळवण्यासाठी चित्रपटसृष्टीतील लोक खूप मेहनत घेतात. पण असे काही मोजकेच कलाकार भाग्यवान ठरतात, ज्यांच्या हातामध्ये ही ट्रॉफी मिळण्याचे भाग्य लाभते. बरं, या मानाच्या ‘ऑस्कर ट्रॉफी’मध्ये कोणाचा पुतळा आहे हे तुम्हाला माहिती आहे का? (Whose idol is in the Oscar trophy; The artists work hard for this trophy)

16 मे 1929 पासून ऑस्कर पुरस्काराची सुरुवात

या अतिप्रतिष्ठित पुरस्काराची सुरुवात अमेरिकेच्या अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने केली. पहिला ऑस्कर पुरस्कार सोहळा 16 मे 1929 रोजी आयोजित करण्यात आला होता. 1927 मध्ये मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेसच्या अकॅडमीच्या बैठकीत पहिल्यांदा ट्रॉफीच्या डिझाइनवर चर्चा झाली. यादरम्यान लॉस एंजेलिसमधील बर्‍याच कलाकारांना त्यांचे डिझाईन्स सादर करण्यास सांगण्यात आले. यादरम्यान शिल्पकार जॉर्ज स्टेनली यांनी बनविलेले शिल्प पुरस्कार सोहळा आयोजकांना व इतर संबंधितांना खूप आवडले. पहिला ऑस्कर सोहळा हॉलीवूडमधील हॉटेल रुझवेल्ट येथे झाला.

मेक्सिकन चित्रपट निर्मात्याचा पुतळा

ऑस्कर पुरस्कारांमध्ये देण्यात येणाऱ्या ट्रॉफीमागे मेक्सिकन चित्रपट निर्माते आणि अभिनेता एमिलियो फर्नांडीजची प्रेरणा आहे. कोक्सुइला, मेक्सिको येथे 1904 मध्ये जन्मलेला फर्नांडीस मेक्सिकन क्रांतीच्या काळात मोठा झाला. अर्धवट शाळा सोडणारा फर्नांडीज हुरिस्टा बंडखोरांचा अधिकारी बनला.1925 मध्ये फर्नांडिजला पकडण्यात आले आणि त्याला 20 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. परंतु तो येथून पळून गेला आणि लॉस एंजेलिसची सीमा ओलांडून इथपर्यंत पोहोचला. पुढचे दशक त्याने वनवासात घालवले.

फर्नांडीजने हॉलिवूडमध्ये अतिरिक्त काम करण्यास सुरुवात केली. येथे मूक फिल्म स्टार डोलोरेस डेल रिओने त्याचे नाव एल इंडीओ ठेवले. तो अभिनेत्री रिओचा चांगला मित्र झाला होता. रिओ ही मेट्रो गोल्डविन मेयर स्टुडिओचे आर्ट डायरेक्टर आणि अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसचे सदस्य केड्रिक गिबॉन्‍स यांची पत्नी होती. डेल रिओने फर्नांडीजची ओळख गिब्न्सशी केली, जो त्यावेळी पुतळ्याच्या डिझाईनवर काम करत होता.

फर्नांडीजला एकही ऑस्कर मिळाला नाही

गिब्न्सने फर्नांडिजला एका स्केचसाठी पोझ देण्यास सांगितले, तीच पोझ 8.5 पौंड वजच्या ट्रॉफीचा मुख्य आधार होती. फर्नांडीजने शांतपणे विचार केला आणि ते मूर्तिमंत पोज बनले. जॉर्ज स्टेनली यांनी ट्रॉफी तयार केली आणि 1929 मध्ये लॉस एंजेलिस येथे पार पडलेल्या पहिल्या ऑस्कर सोहळ्यात ही ट्रॉफी देण्यात आली. आजपर्यंत तीच डिझाईन ठेवण्यात आली आहे. फर्नांडीज आजही मेक्सिकन सिनेमाच्या सुवर्ण काळातील एक महान दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. एक कडवट सत्य हे आहे कि, 50 वर्षांच्या कारकिर्दीत फर्नांडीजला मात्र कधीही ऑस्कर मिळू शकला नाही.

2000 हून अधिक ट्रॉफी प्रदान

1929 पासून आतापर्यंत दोन हजारांहून अधिक ऑस्कर ट्रॉफी देण्यात आल्या आहेत. या ट्रॉफी शिकागोतील आरएस आएंस कंपनी तयार करते. कंपनीला 50 ट्रॉफी तयार करण्यास सुमारे तीन ते चार आठवडे लागतात. यापूर्वी ट्रॉफी तांब्यापासून बनविली जायची. कारण पहिल्या महायुद्धात धातूची कमतरता होती. पण आता 24 कॅरेट शुद्ध सोन्यात प्लेट केलेल्या ब्रिटानियमपासून ट्रॉफी बनवली जाते. ट्रॉफी सुमारे 13 इंच लांब आहे. (Whose idol is in the Oscar trophy; The artists work hard for this trophy)

इतर बातम्या

Maharashtra New Ministers: राणे, पाटील, पवार, कराड यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ; महाराष्ट्राच्या वाट्याला चार मंत्रिपदे

Video | शराबी गाण्यावर तरुणाचा विचित्र डान्स, व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर धुमाकूळ

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI