AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hyena Viral Video : अरेरे… हे काय झालं; चपळ असला म्हणून काय झालं? हायनाच्या दबदब्यापुढं चित्यालाही आपलं शिकार सोडावं लागलं

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पहा. हरणाची शिकार केल्यावर चिता त्यावर ताव मारणार तोच तिथे हायना येते. मग तिथे काय होते. हायनाला पाहताच चित्ताची हवा घट्ट होते आणि तो आपल्या शिकारीला हायनाला नेताना असहाय्यतेने फक्त पाहत राहतो. हायनासमोर चित्ता कसा हतबल होतो हे बघायला येथे मिळतं.

Hyena Viral Video : अरेरे... हे काय झालं; चपळ असला म्हणून काय झालं? हायनाच्या दबदब्यापुढं चित्यालाही आपलं शिकार सोडावं लागलं
व्हायरल व्हिडिओImage Credit source: tv9
| Updated on: Jun 14, 2022 | 3:06 PM
Share

Hyena Viral Video : जंगलात (Jungle) एका पेक्षा एक असे हिंस्र प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये आपल्या भारताबद्दल सांगायाचे म्हटलं की आपण आधी नाव हे वाघाचे घेतो. फक्त वाघ जरी म्हटलं की आनेकांच पाणी पळालेले असतं. पण तुम्हाला हायना माहित आहे का. सामान्यता आफ्रिकन मैदानावर सिंह, स्पॉटेड हायनास, बिबट्या, चित्ता, कॅरॅकल, नाईल मगरी आणि सगळ्यात हिंस्र समजली जामाणारी हायना कुत्री सापडतात. पण जेव्हा शिकार आणि शिकाऱ्याबाबत म्हटलं जात तेंव्हा चित्ताचे (leopard)नाव येते. चित्त्याला सायलेंट किलर असे म्हणतात. कारण तो पापणी लवते ना लवते तोपर्यंत शिकार झालेली असते. जंगलातील प्रत्येक प्राणी चित्ताच्या चपळाईपुढे अपयशी ठरला आहे. तर असम म्हटलं जात की जेथे हायना एकत्र समुहात असतात त्या मार्गावर सिंह ही जात नाही. कारण ते सिंहावर ही धावून जातात. आता या दोघांचा असा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्हीही म्हणाल की जंगलात काहीही शक्य आहे. व्हिडिओमध्ये एक चित्ता आपल्या शिकारीचा आनंद घेत असताना हायना तिथे येते. यानंतर काहीही झाले तरी जंगलातील हायनाची (hyena) स्थिती काय असते आणि याच्यापुढे कसे हार मानावी लागते हे या व्हिडिओतून तुम्हालाही कळेल.

जंगलाच्या जगाचा वेगळा कायदा आहे. इथे जो सामर्थ्यवान आहे, तोच राजा. सिंहाकडून हा टॅग कोणीही हिसकावून घेऊ शकत नसला तरी जंगलात इतरही अनेक प्राणी आहेत जे खूप शक्तिशाली आणि भयानक आहेत. त्यांच्या तावडीत अडकणे म्हणजे मृत्यू निश्चित. यापैकी एक म्हणजे हायना. जी त्याच्या दुष्टपणा आणि क्रुर्तेसाठी ओळखली जाते. हे पाहून अनेक प्राणीही आपली शिकार सोडतात. आता फक्त व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पहा. हरणाची शिकार केल्यावर चिता त्यावर ताव मारणार तोच तिथे हायना येते. मग तिथे काय होते. हायनाला पाहताच चित्ताची हवा घट्ट होते आणि तो आपल्या शिकारीला हायनाला नेताना असहाय्यतेने फक्त पाहत राहतो. हायनासमोर चित्ता कसा हतबल होतो हे बघायला येथे मिळतं. चला तर मग हा व्हिडिओ पाहूया.

View this post on Instagram

A post shared by Earth Reels (@earth.reel)

वन्यप्राण्यांचे हे थक्क करणारे दृश्य earth.reel नावाच्या पेजवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी अपलोड केलेल्या या व्हिडिओला शेकडो लोकांनी लाईक केले आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. मात्र, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच चित्त्याबद्दल वाईट वाटत आहे. त्याचबरोबर जंगलात जो ताकदवान आहे त्याला सिकंदर म्हणतात असे अनेकांचे म्हणणे आहे.

एका यूजरने कमेंट करताना लिहिले की, चित्ताने आपल्या शिकारीसाठी हायनाला जोरदार लढा द्यायला हवा होता. पण त्याने असे काही केले नाही. ते खूप धक्कादायक होते. त्याचवेळी दुसरा युजर म्हणतो की, मला गरीब चित्ताबद्दल वाईट वाटते. हायनासमोर त्याची असहायता पाहण्यासारखी आहे. त्याचप्रमाणे अधिकाधिक लोक आपला अभिप्राय नोंदवत आहेत.

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.