AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | ट्रकचा ब्रेक फेल झाला म्हणून चालकाने 3 किमी केले रिव्हर्स ड्रायव्हिंग; व्हिडीओ तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ट्रक रस्त्यावरून रिव्हर्स गिअरमध्ये चालवला जात आहे. काही दुचाकीस्वारांनी ट्रकला वेढले आहे. (The driver did 3 km of reverse driving as the brakes of the truck failed, see viral video)

VIDEO | ट्रकचा ब्रेक फेल झाला म्हणून चालकाने 3 किमी केले रिव्हर्स ड्रायव्हिंग; व्हिडीओ तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का
ट्रकचा ब्रेक फेल झाला म्हणून चालकाने 3 किमी केले रिव्हर्स ड्रायव्हिंग
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: May 28, 2021 | 7:41 PM
Share

जालना : जर रस्त्याच्या मधोमध आपल्या गाडीचा फेल झाला तर काय कराल? गाडी चालवताना नुसता असा प्रश्न पडला तरी आपले डोके भिरभिरून जाईल. कारण निव्वळ या कल्पनेतूनच आपला थरकाप उडेल. कारण अशा परिस्थितीत बहुतांश लोक हेच म्हणतील की, गाडीचा ब्रेक फेल झाल्यास अपघातच घडेल. काहींच्या म्हणण्यानुसार, जर गाडीच्या ड्रायव्हरला चांगला अनुभव असेल तर तो त्याचे ड्रायव्हिंग कौशल्य पणाला लावून स्वत:चा जीव तसेच इतरांनाही सहज वाचवू शकतो. असाच एक व्हिडिओ अलिकडेच सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही काही क्षणांसाठी स्तब्ध व्हाल. (The driver did 3 km of reverse driving as the brakes of the truck failed, see viral video)

जालना-सिलोद मार्गावरील घटना

ही घटना आहे, महाराष्ट्रातील जालना-सिलोद रस्त्यावरील. ट्रकचा ब्रेक फेल झाला आणि मग पुढे सुरू झाला तो ट्रकचा अपघात टाळण्यासाठीचा थरार. जालना-सिलोद हा मुख्य रस्ता असल्यामुळे समोरून सतत गाड्यांची वर्दळ सुरू होती. त्यामुळे ट्रक नेमका रस्त्याबाहेर कसा घ्यायचा, असा प्रश्न ट्रकचालकापुढे होता. अशावेळी त्याने ट्रक रिव्हर्स गिअरमध्ये घेऊन जवळपास तीन किलोमीटर अंतरापर्यंत मागे चालवत आणला. त्याच्या या रिव्हर्स ड्रायव्हिंगचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रिव्हर्स गिअरमध्ये चालवला ट्रक

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ट्रक रस्त्यावरून रिव्हर्स गिअरमध्ये चालवला जात आहे. काही दुचाकीस्वारांनी ट्रकला वेढले आहे. ते दुचाकीस्वार ब्रेक फेल झालेल्या ट्रकच्या चालकाला ट्रक मागे घेताना मागून येणाऱ्या गाड्यांबाबत सावध करीत आहेत. यातील काहीजण मागून येणाऱ्या गाड्यांना ब्रेक फेल झालेल्या ट्रकपासून अंतर ठेवण्याबाबत इशारे करीत आहेत. त्यामुळे ब्रेक फेल होऊनही ट्रक चालकाने तब्बल 3 किलोमीटरचा रस्ता विनाअपघात पार केला. शेवटी रस्त्याशेजारी मोकळे शेत दिसताच ट्रकचालकाने त्या शेतामध्ये आपला ट्रक वळवला. चालकाने ट्रक नियंत्रित करण्यासाठी शेताच्या खडबडीत पृष्ठभागावर ट्रक नेला. त्यामुळे भरधाव वेगातील ट्रकच्या गतीवर नियंत्रण मिळवून ट्रक थांबवण्यात चालकाला यश आले.

चार हजारांहून अधिक लोकांनी पाहिला व्हिडिओ

हा भयानक व्हिडिओ बातमी लिहिपर्यंत चार हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. यासह अनेक युजर्सनी ट्रकचालक व त्याला ट्रक मागे घेताना मार्गदर्शन करणाऱ्या दुचाकीस्वारांचे कौतुक केले आहे. एका युजरने लिहिले आहे की, ‘ड्रायव्हर आणि दुचाकीस्वारांना सलाम.’ अन्य एका युजरने लिहिले की ट्रक चालकाच्या धैर्याबद्दल काय बोलावे. आश्चर्यकारक! अनेक युजर्सनी वेगवेगळ्या शब्दांत ट्रकचालकाच्या प्रसंगावधानतेचे कौतुक केले आहे. व्हिडीओतील ट्रक रिव्हर्स गिअरने विनाअपघात कसा चालवला जातोय, याचा धम्माल तुम्ही स्वत:च या व्हिडीओतून पाहा. (The driver did 3 km of reverse driving as the brakes of the truck failed, see viral video)

इतर बातम्या

Pune Lockdown update : पुण्यातील वीकेंड लॉकडाऊन उठवला, आरोग्यमंत्र्यांची घोषणा

सरकारी आदेशांचे पालन करण्यात अपयशी, Twitter ला 380000 डॉलर्सचा दंड, फेसबुक-गुगलवरही आरोप

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली