भरधाव वाहनाने अचानक वळण घेतलं, ‘या’ भीषण अपघाताचा व्हिडीओ व्हायरल! धक्कादायक घटना
आज उद्याचं तर सोडाच, माणूस आत्ता आहे तर दुसऱ्या क्षणी नाही. असं म्हणण्या मागचं कारणंही तसंच आहे. अपघात (Accident) होताना तुम्ही जर कधी पाहिला असेल तर तुम्हाला या वाक्यांचे अर्थ चांगलेच माहित असतील.

कधी काय होईल काय सांगता येत नाही. माणूस आज आहे तर उद्या नाही. आज उद्याचं तर सोडाच, माणूस आत्ता आहे तर दुसऱ्या क्षणी नाही. असं म्हणण्या मागचं कारणंही तसंच आहे. अपघात (Accident) होताना तुम्ही जर कधी पाहिला असेल तर तुम्हाला या वाक्यांचे अर्थ चांगलेच माहित असतील. एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होतोय ज्यात चारचाकी अचानक एका गाडीला जाऊन धडकते. अपघात होतो. व्हिडीओ बघताना सुरवातीला याची कल्पना येत नाही. ही चारचाकी एका ट्रॉलीला जाऊन धडकते. यात कुटूंबातील तिघांचा मृत्यू झालाय आणि तीन जण जखमी झालेत. या घटनेची सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) सध्या व्हायरल होतीये.
पंजाबमधील नवांशहरमध्ये एक धक्कादायक घटना घडलीये. काल 12 सप्टेंबरला हा भीषण अपघात झालाय. फगवाडा आणि चंदीगडला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील बहरम शहराजवळ भरधाव ट्रॉलीने दोन कारना अचानक वळण घेत धडक दिल्याने हा अपघात झाला.
या अपघाताच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक ट्रेलर अचानक भरधाव वेगाने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला वळताना दिसत आहे. त्याचवेळी समोरून येणाऱ्या दोन गाड्यांची त्याला धडक बसली. यानंतर ट्रॉली उलटते.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक कार ट्रॉलीखाली पूर्णपणे चिरडली गेलीये, तर दुसऱ्या कारच्या अर्ध्या भागाला त्याचा धक्का बसलाय. हा व्हिडिओ पाहून हृदयाचे ठोके वाढतात.
पंजाबमधील भीषण अपघाताचा व्हिडिओ
ਫਗਵਾੜਾ-ਬੰਗਾ ਸੜਕ ਤੇ ਬਹਿਰਾਮ ਦੇ ਕੋਲ ਦਰਦਨਾਕ ਹਾਦਸਾ, ਟਰਾਲੇ ਥੱਲੇ ਕਾਰ ਆਉਣ ਨਾਲ ਤਿੰਨ ਦੀ ਦਰਦਨਾਕ ਮੌਤ।? Three people were killed in a road accident near Behram on Phagwara-Banga road. ? #Punjab #indianroad #rip #AccidenteVial pic.twitter.com/Op7SfnC36P
— ☬Proud To Be Sikh ☬ (@arshdeep_fan) September 12, 2022
मीडिया रिपोर्टनुसार, या वेदनादायक अपघातानंतर घटनास्थळी लोकांची गर्दी झाली होती. यानंतर रुग्णवाहिका बोलावून जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तिघेही एकाच कुटुंबातील होते.
