AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

येथे नांदतो धनकुबेर; पाण्यासारखा वाहतो पैसा, जगातील सर्वात श्रीमंत गाव माहितेय का? बँकेत 5000 कोटींहून अधिकच्या ठेवी

World Richest Village : जगातील सर्वात श्रीमंत खेड भारतात आहे हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कारण या गावातील बँकेत 5000 कोटींहून अधिकच्या ठेवी आहेत.

येथे नांदतो धनकुबेर; पाण्यासारखा वाहतो पैसा, जगातील सर्वात श्रीमंत गाव माहितेय का? बँकेत 5000 कोटींहून अधिकच्या ठेवी
हे गाव जगात सर्वात श्रीमंत
| Updated on: Aug 12, 2025 | 3:55 PM
Share

गाव म्हटलं की, एक पार, मारुतीचं नाही तर एखाद्या देवाचं मंदिर, माळदाची, मातीची घरं, विहीर, हिरवीगार शेतं, राबणारी लोक, विहिरीवरून पाणी शेंदणाऱ्या महिला, साधेपणा असे काहीसे चित्र आपल्या डोळ्यासमोर येते. पण भारतातील हे गाव या सर्व प्रतिमेला छेद देते. या गावात सगळ्या सोयी-सुविधा उपलब्ध आहे. 24 तास वीज आहे, अनेक दिग्गज बँका आहेत. मोठा दवाखाना आहे. अद्ययावत अशी डिजिटल शाळा आहे. या गावात शहरासारख्या अनेक सोयी-सुविधा आहेत. या गावात लखपतीच नाही तर करोडपती लोक राहतात. हे भारतातीलच नाही तर जगातील सर्वात श्रीमंत खेडं आहे.

गुजरात राज्यात माधापर गावाची बातच न्यारी

हे गाव गुजरात राज्यात आहे. माधापर हे त्याचे नाव आहे. या गावाची एकूण लोकसंख्या आता एक लाखांच्या आसपास 92,000 इतकी आहे. या गावात 7,600 इतकी घरं आहेत. या एकट्या गावात 17 बँकांच्या शाखा आहेत. या गावाची आर्थिक स्थिती अगदी मजबूत आहे. या गावातील रहिवाशांचे या बँकांमध्ये 5 हजार कोटींहून अधिक रुपये जमा आहेत. एखाद्या मोठ्या तालुक्याच्या गावाला, मोठ्या शहरात सुद्धा इतकी आर्थिक उलाढाल होत नाही.

हे गाव इतके समृद्ध कसे?

तर माधापरचे अनेक कुटुंब हे व्यवसाय, नोकरीनिमित्त परदेशात स्थायिक झाले आहेत. अमेरिका, ग्रेट ब्रिटन, कॅनडा, आफ्रिका आमि आखाती देशांमध्ये या लोकांच्या उद्योगांना भरभराट आली आहे. पण ही मंडळी त्यांची पाळंमुळं विसरली नाहीत. बाहेरील ही मंडळी, ही अनिवासी भारतीय त्यांच्या कुटुंबियांना दरमहा मोठी रक्कम पाठवतात. ही मंडळी गावाच्या विकासात ही मोठे योगदान देत आहेत. गावातील शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि सामाजिक कार्यात ते भरभरून मदत करतात. त्यांनी हे गाव आधुनिक बनवण्यासाठी मोठा वाटा उचलला आहे.

12 व्या शतकात वसले गाव

12 व्या शतकात माधापर गाव वसले. कच्छच्या मिस्त्री समुदायाने या गावाची पायाभरणी केली. या समाजाने गुजरातच नाही तर भारतभरात अनेक महत्त्वाची कोरीव आणि आखीव मंदिरं बांधली. अनेक ऐतिहासिक इमारती बांधल्या. पुढे या गावात अनेक समुदायाचे लोक जमा झाले. आज हे गाव विविध सांस्कृतीचा चेहरा झाले आहे.

शहरांपेक्षा चांगल्या सुविधा

माधापरमध्ये शाळा, महाविद्यालये, बँका, आरोग्य केंद्रे, बागबगिचे, रस्ते आणि शहराला लाजवतील अशा सुविधा आहेत. या गावची जीवनशैली, राहणीमान आणि सुविधा शहरापेक्षा चांगले आहे. खेड्याकडे चला या गांधीजींच्या मंत्रात थोडा बदल करून या खेड्याने शहराला झपाट्याने मागे टाकले आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.