AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2024 मध्ये घडणार या 4 भयानक घटना! बाबा वेंगा यांची भविष्यवाणी काय

Baba Vanga Predictions : बाबा वेंगा यांनी आतापर्यंत केलेल्या अनेक भविष्यवाणी खरे ठरल्याचे बोलले जाते. बाबा वेंगा यांनी वर्तवलेला अंदाज नेहमीच चर्चेत राहतो. 2024 साठी बाबा वांगाच्या नवीन भविष्यवाण्या आजकाल खूप चर्चेत आहेत. 2024 साठी त्यांनी वर्तवलेले चार ही अंदाज खूपच भंयकर आहेत.

2024 मध्ये घडणार या 4 भयानक घटना! बाबा वेंगा यांची भविष्यवाणी काय
Baba Vanga Predictions
| Updated on: Nov 28, 2023 | 6:40 PM
Share

Baba Vanga Prediction :  जगात असे काही लोक होते आणि काही अजूनही आहेत ज्यांचे अंदाज अनेक वेळा खरे ठरले आहेत. बाबा वेंगा यांच्या आता या जगात नसले तरी त्याचे अंदाज अनेकदा चर्चेत असतात. त्यांचे अंदाज आतापर्यंत 85 टक्क्यांपर्यंत खरे ठरले आहेत. आता त्यांनी २०२४ या वर्षासाठी केलेले धक्कादायक दावेही समोर आले आहेत.

मिररच्या रिपोर्टनुसार, बाबा वेंगा यांनी 9/11 च्या दहशतवादी हल्ल्याची आणि स्वतःच्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती. बल्गेरियातील बाबा वेंगा यांचे खरे नाव वेंगेलिया पांडेवा गुश्टेरोवा (Vangeliya Pandeva Gushterova) आहे. 1996 मध्ये वयाच्या 84 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

बाबा वेंगाचे यांचे भाकीत खरे ठरले

1980 मध्ये, बाबा वेंगा यांनी रशियाच्या कुर्स्क शहरात एका भयानक घटनेची भविष्यवाणी केल्याचा दावा केला. पाण्याखाली एखादी घटना घडेल आणि संपूर्ण जग त्यावर रडणार असल्याचा दावा त्यांनी केला. ऑगस्ट 2000 मध्ये त्यांची भविष्यवाणी खरी ठरल्याचे सांगितले जाते. शहराजवळ आण्विक पाणबुडी बुडाल्याने एकूण 188 क्रू मेंबर्स मारले गेले. याशिवाय 1989 मध्ये त्यांनी 9/11 च्या हल्ल्याबाबतही भाकीत केले होते आणि म्हटले होते की, ‘अमेरिकेवर हल्ला होईल.

2024 साठी अंदाज काय आहेत?

बाबा वेंगा यांनी 2024 साठी काही आश्चर्यकारकपणे भीतीदायक भविष्यवाणी केली आहे. Astrofame नुसार, 2024 मध्ये रशियाच्या राष्ट्राध्यक्षांची त्यांच्याच देशातील कोणीतरी हत्या करेल. याशिवाय 2024 मध्ये युरोपमध्ये दहशतवादी हल्ला करतील, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.

बाबा वेंगा यांचा दावा आहे की, ‘मोठा देश’ पुढील वर्षी जैविक शस्त्रांची चाचणी किंवा हल्ला करेल. याशिवाय बाबांनी असा दावाही केला आहे की, पुढील वर्षी मोठे आर्थिक संकट येणार असून त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होणार आहे. आता यातील एकही अंदाज खरा ठरतो की नाही हे पाहायचे आहे.

सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....