शिळे होताच हे 5 पदार्थ होतात रुचकर आणि आरोग्यदायी, आजारांना पळवून लावतात
अन्नपदार्थांतील काही गोष्ठी शिळ्या झाल्यानंतर त्या आणखीनच चवीला लागतात. त्यामुळे त्या चांगल्या पचतात देखील.

जेवण नेहमीच तेवढेच बनवावे जेवढ्याची गरज आहे. आयुर्वेद असो की मॉर्डन सायन्स दोन्हींच्या मते जेवण नेहमी ताजे आणि लागलीच बनवून खायला हवे. अन्न फ्रिजमध्ये ठेवल्याने त्याची चव आणि पोषक तत्वे कमी होतात असेही म्हटले जाते. परंतू काही पदार्थ असे असतात जे शिळे झाल्यानंतर अधिक रुचकर होतात आणि त्यातील पोषक गुणही वाढतात. चला तर असे पदार्थ पाहूयात…
शिळ्या चपात्या खाणे
अनेक घरात रात्री उरलेल्या चपात्या सकाळी चहा सोबत खाल्ल्या जातात. जर रात्री चपात्या शिल्लक राहिल्या असतील तर त्यांना गरम करुन खाणे फायद्याचे ठरु शकते. वास्तविक शिळ्या चपात्यात फर्मेंटेशनची प्रक्रिया सुरु झालेली असते. ज्यामुळे गट हेल्थसाठी ती फायदेशीर असते. त्यामुळे एकूणच पचनास फायदा होतो. डायबिटीज मॅनेजमेंटसाठी देखील ही फायद्याची म्हटले जाते.
पोटासाठी चांगला शिळा भात
रात्रीचा उरलेला शिळा भात सकाळी आणखी पौष्टीक होतो. भारताच्या अनेक राज्यात शिळा भाताला फोडणी देऊन एक डिश म्हणून खाल्ले जाते. शिजलेल्या भाताला रात्रभर भिजवले जाते. सकाळी यात कांदा, मीठ, मिरची टाकून खाल्ले जाते. यास पन्ता भात आणि शिळा भात म्हणून खाल्ले जाते. हा फर्मेंटेड राईस पोटासाठी चांगला असतो. यात आयर्न, सोडियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम सारखे पोषक तत्वं देखील भरपूर असतात.
शिळी खीर टेस्टी आणि हेल्दी
भारतीय घरात जेवणात काही गोडधोड खाल्ले जाते. गोड खाण्यासाठी अनेकदा तांदळाची खीर बनवली जाते, हीचा स्वाद एकदम भारी असतो. परंतू तुम्ही रात्री उरलेली शिळी खीर खाता का ? ती आणखीनच टेस्टी लागते आणि आरोग्यासाठी देखील फायद्याची असते. रात्री उरलेली खीर फ्रिज थंड करण्यास ठेवावी आणि सकाळी दुसऱ्या दिवशीचा तिचा स्वाद घ्यावा. थंडगार खीर रबडी सारखी स्वादिष्ठ होते. तुमच्या पोटाच्या आरोग्यासाठी देखील चांगली असते.
शिळे दही देखील फायद्याचे
एक वा दोन दिवस जमण्यासाठी ठेवलेले दही देखील शिळे झाल्यावर फायदेमंद असते. त्यात फर्मेंटेशनची प्रक्रीया वेगाने होते. आणि गुड बॅक्टेरियाची ग्रोथ वाढू लागते. या प्रकारचे दही पचनासाठी चांगले असते. हे शिळे दही पचन सुधारण्यासोबतच इम्युनिटी पॉवर देखील वाढवते. अशा दह्यातील विटामिन्सचे प्रमाण वाढते. ज्या लोकांना दूध वा दही पचत नाही त्यांच्यासाठी शिळे दही उत्तम असते.
शिळा राजमा भात
केवळ भातच नाही तर राजमा चावल देखील शिळा झाल्यानंतर जास्त चविष्ट आणि आरोग्यदायी असतो. रात्रभर राजमा ठेवला जातो, तेव्हा त्यातील मसाले आणि बिन्स चांगले मिक्स होतात . त्यामुळे चवही चांगली होते. यातील कार्ब्स ब्रेकडाऊन होऊ लागतात. त्यामुळे पचन सहज होते. राजमात प्रोटीन, फायबर, आयर्न आणि पोटॅशियम सारखे अनेक पोषक तत्वं असतात. ज्यांना एब्जॉर्ब करणे आणखीन सोपे होते.
