केवळ सुंदर हातांद्वारे ही तरुणी रोज 2.5 लाख कमावते, चेहरा दाखवण्याचीही गरज लागत नाही, परंतू…
मॉडेलिंगची दुनिया केवळ सौदर्यावर चालत असते. यात कमनिय बांधा आणि सुंदर नाजुक चेहराच नाही तर सुंदर हात, पाय, कान आणि मान याद्वारेही दिवसाला २.५ लाख कमावणारे लोक आहेत. परंतू हे इतके सोपेही नाही...

मॉडेलिंग केवळ सुंदर चेहरा वा सुडौल शरीरापर्यंत मर्यादित आहे असे तुम्हाला वाटत असेल, परंतू जगात एक असेही क्षेत्र आहे जेथे केवळ शरीराचा अवयवांद्वारे ( उदा.हात, पाय वा कान ) मॉडेलिंग करणारे लोक लाखो रुपये कमावत आहेत. न्यूयॉर्कची अविशा तेवानी (Avisha Tewani) देखील अशीच एक मॉडेल आहे. ती मोठ – मोठ्या ब्रँड्ससाठी आपल्या सर्वात सुंदर हातांद्वारे रोज सुमारे अडीच लाख कमावत आहे. एवढेच नाही या मॉडेलिंगमध्ये तिला आपला चेहरा दाखवण्याचीही गरज लागत नाही. परंतू डायर (Dior) आणि चॅनल (Chanel) सारख्या हाय एंड ब्रँड्ससाठी कमावणाऱ्या व्यावसायिक मॉडेल अविशा तेवानी हीच्या मते हे एवढे सोपं नाहीए….
३५ वर्षीय अविशा तेवानी हीने २०२० मध्ये हँड मॉडेलिंग क्षेत्रात आपली एण्ट्री केली. याआधी ती एक फ्रीलान्स स्टायलिस्ट होती आणि अजूनही ती आपले काम करत आहेत. एक नातेवाईकासाठी वेडिंग आणि एंगेजमेंट रिंगच्या फोटोशूटमध्ये मदत केल्यानंतर तिने आपले फोटो एका एजंटला पाठवले आणि साईनअप केल्याच्या एक वा दोन आठवड्यातच तिला तिचे पहिले काम मिळाले.
तेव्हा पासून तिने स्टारबक्स, कोका-कोला, एब्सोल्यूट व्होडका आणि काईली कॉस्मेटिक्स सारख्या मोठ्या ब्रँड सोबत काम केले. तिच्या हातांना डागांपासून वाचवण्यासाठी अविशाला तिच्या आयुष्यात अनेक बदल करावे लागले. ती सांगते की, ‘मला सिटी बाईकची सदस्यत्व सोडावे लागले.कारण एका अपघातात मला कोपर आणि मनगटात फॅक्चर झाले.आता मी जोखीम घेऊ शकत नव्हती. ‘
ती सांगते तिला बॉक्सिंगची आवड होती. परंतू तिला वर्कआऊटही बंद करावे लागले. कारण हातांना काही नुकसान होऊ नये. याशिवाय कोणत्याही प्रकारचे वर्क आऊट करताना ती ग्लोव्ह परिधान करते. कारण हातांवर कॅलर्स पडू नये. अविशा हीने सांगितले की ‘मी भांडी धुताना कधी हातमोजे घालत नव्हती, परंतू आता घालावे लागतात.’ ऑगस्ट २०२० मध्ये एजंटशी साईन अप केल्यानंतर अविशाचे करियर वेगाने सुरु आहे. ती अनेक एजन्सींसोबत काम करत आहे ज्या तिचे पाय, कान आणि मान सारख्या शरीराच्या विशिष्ट भागांच्या मॉडेलिंगचे एक्सपरटाईज आहेत. अनेक लोकांना वाटते की शूटमध्ये केवळ वस्तूंना पकडायचे असते. परंतू हे नेहमी आव्हानात्मक असते. क्लायंटच्या मागणी नुसार लोकेशनवर तिला दोन ते १२ तास काम करावे लागते आणि क्रु मध्ये पाच ते ३५ लोकांची टीम असू शकते.
तुमचे हात सुंदर दिसतील.
अविशाने सांगितले की कधी-कधी सकाळी ७ वाजताची बुकींग कन्फर्म होते. ज्यामुळे हे काम कठीण होते. क्लायंटला देखील नीट माहिती नसते की नक्की त्यांना काय हवे. ते तुमच्या रचनात्मकतेवर विश्वास ठेवतात की तुम्ही त्यांच्या उत्पादनाला आकर्षक दाखवाल, ब्रँडला प्रदर्शित कराल आणि हे सुनिश्चित कराल की तुमचे हात सुंदर दिसतील.
एक कबुतर पकडायचे होते
अविशा एक उदाहरण देत सांगते की कधी-कधी एखाद्या ब्रँडजवळ लिपस्टीकसारख्या उत्पादनाचे केवळ एक वा दोनच सँपल असतात. तुम्हाला यास फिरवावे लागते आणि लावावे लागते.या सोबत काही करावे लागते. परंतू सँपल केवळ दोन असतात. यासाठी तुम्हाला हे सुनिश्चित करावे लागते की तुम्ही याला योग्य करावे.’ तिने चॅनल (Chanel) सोबत केल्या कामाबद्दल उत्साह व्यक्त केला. जे व्हेलेंटाईन डे साठी दोन दिवसाचे शूट होते. अविशाने सांगितले की, ‘मेनीक्योर खूप चांगले होते. आणि त्यांनी यास दोन वा तीन वेळा बदलले. मला शॉट साठी एक कबुतर पकडायचे होते.’
