AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाघाने या मुलीला जंगलात ओढून नेलं, भयानक व्हिडीओ

जंगला शेजारील रस्त्यावर कारमधून खाली उतरताना एक वाघ महिलेवर हल्ला करताना दिसत आहे. हा व्हिडिओ जुना असला तरी तो पुन्हा व्हायरल होत आहे.

वाघाने या मुलीला जंगलात ओढून नेलं, भयानक व्हिडीओ
tiger attack on womanImage Credit source: Social Media
| Updated on: Nov 02, 2022 | 2:47 PM
Share

अनेक वेळा लांबच्या प्रवासात जंगलातून जावे लागते. अशावेळी लोकांनी या मार्गांवर खूप काळजी घ्यायला हवी. एखादा प्राणी कधी येऊन हल्ला करेल हे तुम्हाला माहीत आहे का? सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हायरल क्लिपमध्ये जंगला शेजारील रस्त्यावर कारमधून खाली उतरताना एक वाघ महिलेवर हल्ला करताना दिसत आहे. हा व्हिडिओ जुना असला तरी तो पुन्हा व्हायरल होत आहे. वाघाच्या हल्ल्याचा व्हिडिओ पाहून सर्वांनाच धक्का बसलाय.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जंगलाला लागून असलेल्या रस्त्यावर दोन-तीन गाड्या थांबल्या आहेत.

एक स्त्री गाडीतून पुढे उतरते, पण नंतर एक वाघ जंगलातून बाहेर येऊन तिच्यावर अचानक हल्ला करतो. हे दृश्य खरंच भयानक आहे.

त्यानंतर वाघ महिलेला जंगलात ओढून नेतो. या व्हिडीओमध्ये गाडीत बसलेले इतर जण वाघाच्या हल्ल्यानंतर लगेचच महिलेला वाचवण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत. पण ही लोकं त्या महिलेला वाचवू शकली असतील असं वाटत नाही.

हृदय पिळवटून टाकणारा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर animals_powers नावाच्या अकाऊंटसोबत शेअर करण्यात आला आहे.

27 सेकंदाच्या या क्लिपला आतापर्यंत 15 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. त्याचबरोबर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

एका युझरने कमेंट केली की, “ही घटना चीनची आहे. त्याचवेळी आणखी एका युझरने कमेंट केली की, “माणूस केवळ त्याच्या मूर्खपणामुळे मृत्यूच्या तोंडी जातो.

तर आणखी एका युझरने कमेंट केली की, “जंगलात जाताना कारमधून खाली उतरण्याची काय गरज होती. एकूणच हा व्हिडिओ पाहून लोक हैराण झाले आहेत.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.