ट्रान्सजेंडर भावामुळे बहीण झाली आई, जगाला थक्क करणाऱ्या घटनेची चर्चा!
एका भावाने बहिणीच्या सुखासाठी जे काही केले ते ऐकून सर्वजण थक्क झाले आहेत. सध्या या बहिण भावांची सर्वत्र चर्चा सुरु आहे. नेमकं प्रकरण काय आहे चला जाणून घेऊया..

म्हणतात की नात्याची खरी सुंदरता अडचणीच्या काळातच कळते. अडचणीच्या वेळी कधी कोण कोणाला कशी मदत करेल हे सांगता येत नाही. अशीच एक हृदयस्पर्शी कहाणी समोर आली आहे. लंडनमध्ये राहणारे ३० वर्षीय केनी एथन जोन्स (Kenny Ethan Jones) यांनी असेच काही करून दाखवले आहे. त्यांच्या कृत्याने केवळ सोशल मीडियावर लाखो लोकांचे मन जिंकले नाही, तर भावंडांच्या अटूट प्रेमाची (Brother Sister Bond) नवीन व्याख्याही लिहिली आहे. आता त्यांनी नेमकं काय केले आहे. चला जाणून घेऊया…
नेमकं प्रकरण काय?
केनीची बहिण किजी जोन्स (Kizzy Jones) अनेक वर्षांपासून आई होण्याचे स्वप्न पाहत होती. पण वाढत्या वयामुळे आणि आरोग्याच्या कारणांमुळे तिला वारंवार गर्भपाताचे (मिसकॅरेज) दु: ख सहन करावे लागत होते. डॉक्टरांनी सांगितले की सर्व काही निरोगी आहे, पण अंड्यांची गुणवत्ता योग्य नसल्यामुळे ती गर्भवती होऊ शकत नाहीत.
बहिणीसाठी भावाने घेतला मोठा निर्णय
mom.com च्या रिपोर्टनुसार, केनी ट्रान्सजेंडर पुरुष आहेत आणि गेल्या १० वर्षांपासून हार्मोन थेरपी घेत होते. पुरुष म्हणून स्वतःची ओळख मजबूत करण्यासाठी ही थेरपी त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती. पण जेव्हा त्यांना कळाले की त्यांच्या बहिणीला डोनरची गरज आहे, तेव्हा त्यांनी विचार न करता आपली थेरपी थांबवण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले, हे अजिबात सोपे नव्हते. कारण, थेरपी थांबवल्याने मला ‘जेंडर डिस्फोरिया’चा धोका होता. पण माझ्या बहिणीच्या सुखासमोर हे दुखः काहीही नव्हते. त्यामुळे मी आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेतला.
यानंतर केनींनी एग डोनेशन प्रक्रिया सुरू केली. ही प्रक्रिया त्यांच्यासाठी शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्ट्या खूप आव्हानात्मक होत. पण त्यांच्या हिम्मतने सर्व काही ठिक झाले. डॉक्टरांनी केनीच्या शरीरातून 19 अंडी काढली, ज्यापासून ६ निरोगी भ्रूण तयार झाले. आता केनीची बहिण आई होऊ शकेल. केनीची ही कहाणी सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाली आहे. नेटिझन्स त्यांना ‘सुपर ब्रदर’ म्हणत आहेत. लोकांचे म्हणणे आहे की हे फक्त एक वैद्यकीय केस नाही, तर समाजासाठी एक संदेशही आहे की कुटुंबासाठी दिलेली कुर्बानी हेच सर्वात मोठे ‘प्रेम’ आहे.
