75th Independence Day: स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी स्पेशल दिसण्यासाठी फॉलो करा ‘ही’ स्टाईल

यंदा 15 ऑगस्ट रोजी भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा होणारा असून हे अमृत महोत्सवी वर्ष देशभरात साजरे केले जाणार आहे. तुम्हालाही हा खास दिवस साजरा करत स्पेशल दिसायचे असेल तर या टिप्स फॉलो करा.

75th Independence Day: स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी स्पेशल दिसण्यासाठी फॉलो करा 'ही' स्टाईल
75th Independence Day,
Image Credit source: google
प्राजक्ता ढेकळे

|

Aug 05, 2022 | 12:28 PM

Independence Day Outfit Ideas: दरवर्षी प्रमाणे यंदाही 15 ऑगस्ट रोजी म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपला भारत (India) देश तिरंग्याच्या रंगांत रंगलेला दिसून येईल. विशेष म्हणजे यंदा 15 ऑगस्ट रोजी भारताचा 75 वा स्वातंत्र्य ( 75th Independence Day) दिन साजरा होणारा असून हे अमृत महोत्सवी वर्ष देशभरात साजरे केले जाणार आहे. तुम्हालाही हा दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा असेल तर तुम्ही पेहरावात (outfit ideas) तिरंग्याच्या रंगांचा समावेश करू शकता. स्वातंत्र्य दिनाच्या सेलिब्रेशनासाठी आजपासूनच खास तयारी करायला घ्या. देशाचा हा 75 वा स्वातंत्र्य दिन वेगळ्या पद्धतीने साजरा करा. जर तुम्हाला दर वर्षीचे कपडे घालून कंटाळा आला असेल आणि काही नव्या गोष्टी ट्राय करायच्या असतील ‘या’ टिप्स फॉलो करून पहा.

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ‘या’ स्टाईल्सचा अवलंब करता येईल.

सदाबहार सफेद अर्थात पांढरा रंग –

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मुलं पांढऱ्या रंगांचा कुर्ता आणि त्यासह डेनिम जीन्स किंवा पांढरा पायजमा घालू शकता. मुली, स्त्रियांसाठीही पांढऱ्या रंगाचा कुर्ता – सलवार किंवा साडीचा पर्याय उपलब्ध आहे.

तीन रंगाचा आउटफिट

तुम्ही या दिवसासाठी तिरंग्याच्या रंगावरून प्रेरणा घेऊन तसे कपडे परिधान करू शकता. या दिवशी भगवा किंवा हिरवा कुर्ता, त्याखाली पांढरा पायजमा अथवा पॅंट वापरू शकता. तर मुली यादिवशी साडी अथवा पांढऱ्या रंगाच्या कुर्ता- सलवारसह तिरंगी ओढणी वापरू शकतात.

तिरंगी ॲक्सेसरीज

या दिवशी महिला एखादा सिंपल, साधा ड्रेस घालून त्यावर तिंरग्याच्या रंगाच्या ॲक्सेसरीज उदा. भगवा, हिरवा व पांढऱ्या रंगाच्या बांगड्या घालू शकतात किंवा त्या कॉम्बिनेशनधील टिकली लावू शकतात. मुलंही तिरंगी घड्याळ अथवा ब्रेसलेट घालू शकतात.

स्लोगन असलेले टीशर्टस

या दिवशी खास ड्रेस घालायचा असेल तर तुम्ही स्वातंत्र्य दिनाचे स्लोगन अथवा घोषणा लिहिलेले टीशर्टस विकत घेऊन घालू शकता. किंवा पांढऱ्या अथवा काळ्या रंगाच्या टीशर्टवर स्वत:च्या हातानेही स्लोगन लिहू शकता.

ट्रॅडिशनल नेहरू जॅकेट

या दिवशी एखादा हटके लूक हवा असेल तर तुम्ही कुर्ता वा टी-शर्टवर एखादे ट्रॅडिशनल नेहरू जॅकेट घालू शकतात. त्यासह तुम्ही तिरंग्याचा बॅचही ड्रेसवर लावू शकता.

खादीचा वापर करा

‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ यांचे प्रमोशन करण्यासाठी खादीचे कपडेही वापरून पाहू शकता. एक वेगळा, हटके लूक तुम्हाला मिळू शकेल .

पगडी घालू शकता

जर तुम्हाला एकदम वेगळा, युनिक लूक हवा असेल तर तुम्ही टीशर्ट आणि जीन्स घालून , डोक्यावर तिरंग्याच्या रंगाची पगडी घालू शकता. हा लूक सर्वांनाा नक्कीच आवडेल.

हे सुद्धा वाचा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें