उबेरवरुन बुक केला ऑटो, 62 रुपयांऐवजी 7 कोटी बिल

Uber India: सोशल मीडियावर हा व्हिडिओ गेल्यानंतर इंटरनेट युजर्स अनेक कॉमेंट करत आहेत. एका युजर्सने म्हटले आहे, आता उबेरवर ईडीची रेड पडली पाहिजे. आणखी एका युजरने आपला अनुभव शेअर करत उबेरवरुन आलेले 2 कोटी 28 लाख 22 हजार 601 रुपयांचे बिल जोडले आहे

उबेरवरुन बुक केला ऑटो, 62 रुपयांऐवजी 7 कोटी बिल
uber india
Follow us
| Updated on: Apr 02, 2024 | 2:10 PM

ओला, उबेर बुक करुन अनेक जण शहरांमध्ये प्रवास करत असतात. आपल्या लोकेशनपर्यंत या रिक्षा किंवा टॅक्सी येत असतात. तसेच आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी किती रक्कम लागणार यासंदर्भात माहिती त्यातून मिळत असते. पुणे, मुंबईसह अनेक मोठ्या शहरांमध्ये ही सुविधा आहे. परंतु उबेर रिक्षासंदर्भात एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये एका छोट्या राईडसाठी सात कोटी बिल दाखवण्यात आले आहे. हे बिल पाहून त्या व्यक्तीला धक्काच बसला. मंगळ ग्रहावरुन तर ती रिक्षा आली ना? असा प्रश्न त्याने केला. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यावर अनेक कॉमेंट येत आहेत.

बिल आले 7.66 कोटी रुपये

आशिष मिश्रा या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यानुसार दीपक तेनगुरिया या व्यक्तीने उबेरवरुन रिक्षा बुक केली. त्याला ज्या स्थळी जायचे होते, त्याचे भाडे जवळपास 62 रुपये येते. परंतु तो लोकेशनवर पोहचल्यावर त्याला धक्काच बसला. त्याला त्या छोट्या राईडसाठी तब्बल 7.66 कोटी रुपये भाडे दाखवण्यात आले. दीपक यांनी हा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला आहे.

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियावर पडलेल्या प्रतिक्रिया

असा घडला प्रकार

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच, त्यावर जोरदार कॉमेंट सुरु झाले आहेत. या व्हिडिओत दीपक आशीषला विचारतो, तुमचे बिल किती आले, दाखवा जरा. त्यानंतर दीपक 7 कोटी 66 लाख रुपये आलेले बिल दाखवतो. विशेष म्हणजे या बिलवर वेटिंग चार्ज नाही. जीएसटीसुद्धा नाही. त्यानंतर आशीष त्याला विचारतो, तुम्ही मंगळवरुन आले आहात की काय?

इंटरनेट युजर्सचे अनेक कॉमेंट

सोशल मीडियावर हा व्हिडिओ गेल्यानंतर इंटरनेट युजर्स अनेक कॉमेंट करत आहेत. एका युजर्सने म्हटले आहे, आता उबेरवर ईडीची रेड पडली पाहिजे. आणखी एका युजरने आपला अनुभव शेअर करत उबेरवरुन आलेले 2 कोटी 28 लाख 22 हजार 601 रुपयांचे बिल जोडले आहे. त्यात वेटिंग टामईचा चार्ज 2,28,550 रुपये लावला आहे. अनेकांनी असे अनुभव शेअर केले आहे. लोकांच्या या कॉमेंटवर उबेरकडून त्या ठिकाणी स्पष्टीकरण करण्यात आले आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करु असे उबेरने म्हटले आहे.

Non Stop LIVE Update
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.