मासे, कार आणि जीपच्या आकाराची बनवली जाते समाधी, अनोख्या गावातील प्रथा वाचून तोंडात बोट घालाल
भारतातील 'या' गावात आहेत वेगवेगळ्या आकाराच्या समाधी... मृत व्यक्तींच्या आठवणीत मासे, कार आणि जीपच्या समाधी, काय आहे गावची प्रचंड जुनी परंपरा? अनोख्या गावातील प्रथा वाचून तोंडात बोट घालाल

एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर त्याच्या आठवणी कायम आपल्यासोबत असतात. पण छत्तीसगडच्या धमतरी जिल्ह्यात एक अनोखी परंपरा आहे. सिहाना प्रदेशातील वनवासी त्यांच्या नातेवाईकांच्या मृत्यूनंतर वेगवेगळ्या आकारांची समाधी बांधतात. समाधी बनवत असताना मृत व्यक्तीच्या आवडीनिवडींची विशेष काळजी घेतली जाते. या प्रदेशातील गावांमध्ये तुम्हाला कार, ट्रक आणि माशांच्या आकाराच्या अनेक समाधी दिसतील, ज्या लक्ष वेधून घेतात तसेच आश्चर्यचकित करतात. जरी हे प्रदेश सप्तऋषी पर्वत, महानदीचे मूळ, सुंदर जंगले आणि सीतानदी व्याघ्र प्रकल्प यासाठी ओळखले जात असले तरी, या प्रदेशात आणखी एक अनोखी परंपरा आहे जी तुम्हाला इतरत्र क्वचितच दिसेल.
प्रदेशातील परंपरा हैराण करणारी आहे पण तेवढीच खास देखील आहे. जेव्हा तुम्ही सिहवाच्या आसपासच्या गावांमध्ये जाल तेव्हा तुम्हाला अनेक ठिकाणी समाधी आढळतील. या समाधींमध्ये तुम्हाला विशिष्ट आकाराच्या समाधी देखील दिसतील.
गावाची परंपरा
गावात बांधलेल्या समाध्यांमध्ये तुम्हाला कार, जीप, घर आणि मासे अशा डिझाइन दिसतील. मृत व्यक्तीचे नाव, त्याची जन्मतारीख आणि मृत्यू देखील या समाध्यांवर कोरलेलं आहेत. यासोबतच, त्यांना वेळोवेळी रंगवले जाते. सण किंवा लग्न अशा खास प्रसंगी, मृतांचे नातेवाईक येथे दिवे लावतात. या अनोख्या समाध्या गावात नवीन आलेल्या लोकांचं लक्ष वेधून घेतात. या भागातील जवळजवळ सर्वच गावांमध्ये अशा समाध्या आहेत.
गावातील संजय कुमार, राजेश उईके आणि कैलाश प्रजापती म्हणाले की, 21 व्या शतकात जग 5 जी आणि 6 जी वेगाने धावत असले तरी, वनवासी अजूनही ही शतकानुशतके जुनी परंपरा जपत आहेत. या अनोख्या परंपरेत देखील काही मान्यता आहेत. मृत व्यक्तीच्या आत्म्याला सुख आणि शांती या समाधीमुळे मिळते… असं सांगतात.
समाधी मृत व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित असलेल्या आकारात बनवले जातात. म्हणजेच, त्याच्या हयातीत, त्याचा या गोष्टींशी काही संबंध असला पाहिजे, मग तो छंदामुळे असो किंवा मृत व्यक्तीच्या नोकरीशी संबंधित असो. ही परंपरा शतकानुशतके जुनी असल्याचं म्हटलं जातं. परंतु आजचे सुशिक्षित आधुनिक तरुणही या परंपरेचे पालन करत आहेत आणि त्यांना त्याचा अभिमान आहे.