Video: हौसलो सें उडान होती है…छोट्याचा मोठा कारनामा, कब्बडीत थेट तंगडी धरली, अन्…

हा चिमुरडा काहीही करणार नाही, उलट हा बाहेर पडतो की काय? असं वाटत राहतं. मात्र, इथंच आपण चुकतो

Video: हौसलो सें उडान होती है...छोट्याचा मोठा कारनामा, कब्बडीत थेट तंगडी धरली, अन्...
कब्बडी खेळताना चिमुरडा
Follow us
| Updated on: Sep 23, 2022 | 5:14 PM

मुंबई: हिंमत आणि ताकद…शब्द जरी सारखे वाटले, तरी दोन्हींमध्ये खूप फरक आहे. कण वाळूचे रगडीता तेलही गळे, ही म्हण आपल्याकडे सर्रास वापरली जाते. मात्र त्याचा प्रत्येय कधीतरीच येतो. याच म्हणीची आठवण करुन देणारा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आहे, एका चिमुरड्याचा, जो कब्बडी (Kabbadi) खेळताना दिसत आहे. या व्हिडीओतील चिमुकल्याची हिंमत तुम्ही पाहिली, तर तुम्हीही म्हणाल, संकटांना टक्कर देण्याची ताकद प्रत्येकात असते.

या व्हिडीओत कब्बडीचा सामना दिसत आहे. जिथं निळ्या जर्सीमध्ये काही मुलं मैदानात दिसत आहे. तेवढ्यात समोरच्या टीममधून एक जण डाव टाकायला या गटात येतो. हा मुलगा वयाने मोठा आणि ताकदवान आहे. हा किमान 2-3 खेळाडूंना बाहेर काढेल असं वाटत राहतं. तितक्यात आपली नजर एकदाम कोपऱ्यात असणाऱ्या चिमुरड्यावर जाते. अगदी लहानसा, कमी वयाचा आणि नवखा असणारा हा चिमुरडा खेळासाठी उत्सुक असलेला दिसतो.

हा चिमुरडा काहीही करणार नाही, उलट हा बाहेर पडतो की काय? असं वाटत राहतं. मात्र, इथंच आपण चुकतो, या चिमुरड्याची हिंमत आपल्याला पुढच्याच सेकंदाला दिसते. जसा विरोधी खेळाडू परत जायला लागतो, तसा हा छोटुसा खेळाडू थेट त्याच्या पायावर उडी घेतो, आणि जीव लावू पाय खेचतो. पुढच्या खेळाडूपुढे याची ताकद अगदी नगण्य आहे, मात्र या चिमुरड्याची हिंमत पर्वताएवढी आहे. आणि इथं हिंमतीचाच विजय होतो.

हे सुद्धा वाचा

जसा हा चिमुरडा, या खेळाडूचे पाय पकडतो, सगळी ताकद लावून त्याला खेचतो, त्यावेळी इतरही टीममध्ये आशा निर्माण होते, आणि सगळे खेळाडू विरोधकावर तुटून पडतात. आणि काहीच क्षणांत या खेळाडूला खेचून परत आल्या चौकटीत आणतात.

पाहा चिमुरड्याचा व्हिडीओ:

हा व्हिडीओ, अनेकांना प्रेरणा देणारा आहे.यूपीचे भाजप खासदार डॉ. महेश शर्मा यांनी हा व्हिडीओ त्यांच्या पेजवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी एक शेअर लिहला आहे, त्या ते म्हणतात, ‘मंजिल उन्हीं को मिलती है, जिनके सपनों में जान होती है, पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है।’ तब्बल 1.5 मिलियन लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. त्यावरुन हा व्हिडीओ किती व्हायरल होत आहे, त्याचा तुम्हाल अंदाज येईल.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.