बाईने स्मशानभूमीत कहरच केला, राखेला पाहून म्हणाली I Love you, पुढे काय झालं वाचा….
इंस्टाग्राम युजर्स साइबा ह्या एक कंटेंट क्रिएटर्स आहेत, ज्यांचे 1.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. ते अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी नाचणारे व्हिडिओ बनवतात, तर अभिनय करून लोकांचे मनोरंजनही करतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केली होती ती तुफान व्हायरल झाली आहे.

आजकाल लोकांना रिल्स बनवायला खूप आवडतात, अनेकांचे तर ते कमाईचे साधन बनलेलं आहे. त्यामुळे रिल्स बनवण्यावर अधिक भर दिला जातो. त्यात अनेक लोक ही रिल्स बनवण्यासाठी काय करत नाही असे नाही, त्यांचा कहर तर इतका आहे की चक्क भर रस्त्यात बसून देखील रिल्स बनवतात. एवढेच नाही तर आता धार्मिक आणि सामाजिक स्थळांनाही सोडले नाहीये त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला अनेक रिल्स पाहायला मिळत आहे.
अशातच एका मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ती मुलगी रिल्सच्या नादात चक्क स्मशानभूमीत डान्स करताना दिसत आहे. एकतर अशा ठिकाणी डान्स करणे त्यात एकदम आगळावेगळा डान्स करून सोशल मीडियावर टाकल्याने नेटकरी हैराण झाले आहेत. या व्हिडीओमध्ये त्यापेक्षाही आश्चर्याची बाब म्हणजे ती मुलगी अस्थीचा कलश पाहून नाचत आहे आणि गाण्याच्या माध्यमातून त्या कलशाला ‘आय लव्ह यू’ म्हणत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक म्हणत आहेत की, ही मुलगी कुणालाही शांतपणे मरू देत नाहीये.
इंस्टाग्राम युजर सायबा ही कंटेंट क्रिएटर आहे. तिचे 1.9 मिलियन फॉलोअर्स आहे. ती अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी डान्स करणारे व्हिडिओ बनवते आणि अभिनय करून लोकांचे मनोरंजन ही करते. काही दिवसांपूर्वी तिने एक व्हिडिओ पोस्ट केली होती, जी अजूनही प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती एका स्मशानभूमीत डान्स करत आहे. ती मुलगी या व्हिडिओमध्ये बॉबी देओल आणि ट्विंकल खन्ना यांचा ‘बरसात’ चित्रपटातील ‘लव्ह तुझे लव्ह मैं करती हूं’ या गाण्यावर ती डान्स करत आहे.
स्मशानात अस्थींचा कलश पाहून डान्स करते
ती मुलगी व्हिडिओमध्ये सुरु असलेले गाणाच्या इशाऱ्यावर डान्स करत अस्थीच्या कलशाला बघून ‘आय लव्ह यू’ बोलत आहे. दरम्यान ही मुलगी समशानभूमीत असलेल्या अस्थीच्या कलशाला पाहून डान्स करत आहे. डान्स करताना तिचा लुक हा ग्लॅमरस दिसत आहे. अशातच डान्स करता करता जेव्हा या गाण्यात मेल सिंगरचे लिरिक्स येतात, तेव्हा ती मुलगी ज्या पद्धतीने अभिनय करते की त्या स्मशानभूमीत कोणती तरी आत्मा आहे ती लिरिक्स गात आहे. जेव्हा तिला समजत तेव्हा ती त्या ठिकाणाहून पळून जाते.
View this post on Instagram
व्हिडीओ व्हायरल
या व्हिडिओला ४० लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी हा व्हिडीओ पाहून गमतीशीर व टीका केल्या आहेत. तर यावेळी एका युजरने म्हटले की, “ही मुलगी स्म्शानात शांतपणे मरू ही देत नाहीत!” तर दुसऱ्याने युजरने कमेंट केली आहे की, “तुम्ही स्मशानभूमीत कोणासाठी नटून आलेली आहात?” एक जण म्हणाला, “आता स्मशानभूमीत असलेल्या आत्म्यांमध्ये भाडं लावून देत आहेत का?” तसेच आणखी एक जण म्हणाला की, “स्मशानातील आत्मा प्रेमात पडला तर तुही आत्म्यासारखी इकडे तर तुम्ही पळून जाल!”