UPSC 2021 Result: आरा काय तो गोंधळ! हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं, हे वाचून UPSCचे पोरं परत आपला रिझल्ट चेक करतील

निकाल लागताच काही उमेदवारांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला तर काही निराशेच्या गर्तेत बुडाले. बुलंदशहर येथील रहिवासी उत्तम भारद्वाज यांना त्यांची एक चूक महागात पडलीये. या चुकीमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलंय.

UPSC 2021 Result: आरा काय तो गोंधळ! हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं, हे वाचून UPSCचे पोरं परत आपला रिझल्ट चेक करतील
उत्तम भारद्वाज
Image Credit source: facebook
रचना भोंडवे

|

Jun 04, 2022 | 11:27 AM

यूपीएससी परीक्षा (UPSC Exam) ही सर्वांसाठीच मोठी संधी असते. यूपीएससीचा निकाल 30 (UPSC 2021 Final Result) मे रोजी जाहीर झाला आहे. निकाल लागताच काही उमेदवारांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला तर काही निराशेच्या गर्तेत बुडाले. बुलंदशहर येथील रहिवासी उत्तम भारद्वाज यांना त्यांची एक चूक महागात पडलीये. या चुकीमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलंय. यूपीएससीचा निकाल बघताना उत्तम भारद्वाज यांनी त्यांचा रोल नंबर आणि वडिलांचे नाव न पाहता संपूर्ण गावात आणि मीडियात आपण आयएएस (IAS Officer)झालो आहोत, अशी ओरड केली. त्याचबरोबर यूपीएससी परीक्षेत 121 वा क्रमांक मिळवून परीक्षा उत्तीर्ण झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

24 तासांनंतर सत्य समोर आले

अशी बातमी ऐकून अर्थातच उत्तम भारद्वाज यांचं संपूर्ण कुटूंब भारावून गेलं. त्यांनी संपूर्ण कॉलनीत मिठाईचे वाटपही केलं. त्याचबरोबर नातेवाईकांनाही कळवलं, आनंदाची बातमी दिली. 24 तास कुणाला काहीच खबर नाही, संपूर्ण कुटूंब आनंदात. 24 तासांनंतर कळतं की यूपीएससीची ही परीक्षा बुलंदशहरच्या उत्तम भारद्वाजने नाही तर हरियाणातील सोनीपत येथील उत्तम भारद्वाज या विद्यार्थ्याने उत्तीर्ण केलीये.

उत्तम भारद्वाज यांची परराष्ट्र मंत्रालयात नियुक्ती

उत्तम भारद्वाज हे मूळचे बुलंदशहर जिल्ह्यातील देवीपुरा येथील रहिवासी आहेत. पण सध्या ते दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयात असिस्टंट सेक्शन ऑफिसर आहेत. उत्तमची ही यूपीएससीची परीक्षा पहिली होती. पण दुर्दैवाने ते यात पास झाले नाहीत.

असा झाला गोंधळ

हा सगळा गोंधळ एका रोल नंबरमुळे झाला होता. बुलंदशहर येथील रहिवासी असलेल्या उत्तम भारद्वाज यांनी आपल्या रोल नंबरचा शेवटचा नंबर न पाहता हरियाणातील सोनीपत जिल्ह्यात राहणाऱ्या उत्तम भारद्वाज यांचा रोल नंबर तिथे पाहिला आणि त्यांचा गोंधळ उडाला, आपण या परीक्षेत यशस्वी झालो असं त्यांना वाटलं आणि त्यांनी क्रॉस चेक न करताच सगळीकडे मिठाई वाटली. त्यानंतर हरियाणातील विद्यार्थ्याने रोल नंबरवर आपला हक्क सांगितला. बुलंदशहरातील उत्तमचा रोल नंबर 3516894 होता, हरियाणात राहणारा उत्तम भारद्वाज या विद्यार्थ्याचा रोल नंबर 3516891 होता.

उत्तम भारद्वाज रुग्णालयात दाखल

उत्तम भारद्वाज यांना आपली समजताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. या सगळ्या प्रकारानंतर त्यांच्या कुटूंबियांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं. आता त्यांची प्रकृती ठीक आहे. त्यांचं कुटूंबीय या सगळ्या प्रकारानंतर मीडियाला प्रतिक्रिया द्यायचं टाळत आहेत. प्रकृती स्थिरावल्या नंतर उत्तम भारद्वाज यांनी झालेल्या प्रकाराबद्दल सर्वांची माफी मागितली.

हे सुद्धा वाचा

उत्तम भारद्वाज यांचे पत्र

उत्तम भारद्वाज यांनी पत्र लिहून माफी मागितली आहे. त्यांनी लिहिले, “मी उत्तम, मनापासून झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागतो. मला खूप वाईट वाटतंय की माझ्या दस्तऐवजात रोल नंबर नोंदवताना माझी चूक झाली आणि या चुकीमुळेच यूपीएससी सीएसई 2021 मध्ये माझ्या निवडीबद्दल चुकीची माहिती सगळीकडे पसरली. या चुकीबद्दल मी माफी मागतो, कृपया मला माफ करा.”

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें