विना ड्रायव्हर रस्त्यावर धावणारी बाईक पाहिलीये का, व्हायरल व्हिडीओने आनंद महिंद्राही आवाक

सोशल मीडिया हे एक व्यासपीठ आहे जिथे कोणताही व्हिडीओ किंवा पोस्ट येताच व्हायरल होतात. असे काही व्हिडीओ आहेत ज्यांवर विश्वास ठेवणे थोडे कठीण आहे. आता सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जे पाहून सोशल मीडिया वापरकर्ते आश्चर्यचकित झाले आहेत.

विना ड्रायव्हर रस्त्यावर धावणारी बाईक पाहिलीये का, व्हायरल व्हिडीओने आनंद महिंद्राही आवाक
trending news

मुंबई : सोशल मीडिया हे एक व्यासपीठ आहे जिथे कोणताही व्हिडीओ किंवा पोस्ट येताच व्हायरल होतात. असे काही व्हिडीओ आहेत ज्यांवर विश्वास ठेवणे थोडे कठीण आहे. आता सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जे पाहून सोशल मीडिया वापरकर्ते आश्चर्यचकित झाले आहेत. आपल्या चाहत्यांचे नेहमी मनोरंजन करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आनंद महिंद्रा यांनी एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर ते स्वतः घाबरले तसेच युजर्सही आवाक झाले आहेत.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @DoctorAjayita वापरकर्त्याने आपल्या अकाऊंटवर एक आश्चर्यकारक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये पाहिले जाऊ शकते की बाईकच्या मागच्या सीटवर एक माणूस बसला आहे आणि समोरची ड्रायव्हरची सीट रिकामी आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बाईक खूप वेगाने धावत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला लोकांच्या अनेक धक्कादायक प्रतिक्रिया पाहायला मिळतील.

व्हिडीओ शेअर करताना, ट्विटर वापरकर्ता @DoctorAjayita डॉक्टर अजयिताने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘एलोन मस्क म्हणाले, मला चालकविरहित वाहने भारतात आणायची आहेत’.

दुसरीकडे, उद्योगपती आनंद महिंद्राबाबत बोलायचं झालं तर तर ते दररोज त्यांच्या ट्विटर खात्यावरुन काही व्हिडीओ किंवा पोस्ट शेअर करत असतात. त्यांच्या काही पोस्ट मजेदार असतात तर काही प्रेरणादायी असतात. आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ देखील शेअर केला आहे जो आता त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, ‘खूप आवडले … मुसाफिर हूं यारों… ना ड्राइवर है, ना ठिकाना..’. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला. तसेच, आमनंद महिंद्रा यांनी दिलेलं हे कॅप्शनही त्यांच्या पसंतीस पडत आहे.

या व्हिडीओवर आतापर्यंत 477.6k व्ह्यूज आले आहेत. तसेच हा व्हिडीओ देखील अनेक वेळा रिट्विट करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

Video: कुत्र्याच्या भुंकण्यावर सरडा चिडला, त्यानंतर जे झालं, त्याने नेटकरी पोट धरुन हसले!

Video: पगडी खोलली, पाण्यात फेकली, दोघांना वाचवलं, शिख तरुणांचा चित्तथरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI