viral video : इको फ्रेंडली ऊसाचा रस काढणारी मशिन, कमी मनुष्यबळात झटपट रस

ऊसाच्या या नविन मशिनमध्ये ऊसाला वारंवार स्पर्श न होता स्वच्छता राखली जाते. तसेच पारंपारिक मशिनची मोटर डीझेलवर चालविली जाते. त्यामुळे प्रदूषण होत असते. परंतू नविन मशिन इकोफ्रेंडली आहे.

viral video : इको फ्रेंडली ऊसाचा रस काढणारी मशिन, कमी मनुष्यबळात झटपट रस
sugar machineImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: May 16, 2023 | 1:07 PM

मुंबई : आपण ऊसाचा रस काढणाऱ्या अनेक मशिन पाहील्या असतील. या मशिनला डीझेल किंवा इलेक्ट्रीकवर चालणारी मोटर लावलेली असते. परंतू आता बाजारात ऊसाचा रस काढणारी नविन इलेक्ट्रीक शुगरकेन मशिन ( Electric Sugarcane Juice ) आली असून त्याद्वारे झटपट सोप्या पद्धतीने ऊसाचा रस निघत असून त्यामुळे कमी मनुष्यबळात इको फ्रेंडली पद्धतीने ऊसाचा रस मिळत आहे. विशेष म्हणजे या मशिनद्वारे विना मानवी स्पर्श शुद्ध रस मिळत असल्याने या मशिनला मागणी वाढणार आहे.

ऊसाच्या पारंपारिक मशिनमध्ये ऊसांच्या कांड्या मशिनमध्ये टाकताना हातांचा स्पर्श वारंवार करून त्या ऊसाला मोटरच्या चरक्यात वारंवार पिळावे लागते. त्याला वारंवार हाताचा स्पर्श होत असल्याने स्वच्छता राखली जात नाही. परंतू या मशिनमध्ये ऊसाला वारंवार स्पर्श न होता स्वच्छता राखली जाते. तसेच पारंपारिक मशिनची मोटर डीझेलवर चालविली जाते. त्यामुळे प्रदूषण होत असते. या नव्या मशिनची मोटर इलेक्ट्रीकवर चालत असल्याने प्रदूषण टळण्यास मदत होते.

येथे पाहा व्हिडीओ

या हायटेक ऑटोमेटेड ऊसाच्या मशीनचा हा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमावर चांगलाच व्हायरल होत आहे. सेवानिवृत्त एअर मार्शल (IAF), अनिल चोप्रा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर टाकला आहे, ज्यामध्ये ज्यूस काढणारी व्यक्ती मशीनची काही बटणं दाबून तुम्हाला अवघ्या काही मिनिटांतच रस काढून देत आहे.ऊसाचा रस काढणारी ही व्यक्ती केवळ मशिनचे एक झाकण उघडून त्यात ऊस टाकताना दिसत आहे. त्यानंतर तो पुन्हा त्या ऊसाला स्पर्श करीत नाही. तो ऊस संपूर्णपणे आपोआप मशिनच्या आत खेचला जातो. त्यानंतर एका नळाखाली तो मनुष्य केवळ ग्लासात चाट मसाला टाकून तो ग्लास त्या नळाखाली धरतो आणि थेट ज्यूस ग्लासात पडताना दिसत आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.