AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video : कमाल आहे, पुरुषाने हाय हील्स घालून शंभर मीटर रेसमध्ये केला गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड

हाय हिल्सचे बुट घालून फिरणे हे तशी पाहीली तर स्रियांची मक्तेदारी आहे. त्यांना उंच टांचाच्या बुटांनी चालण्यासाठी देखील सराव करावा लागत असतो. त्यात एका पुरुषाने हाय हील्समध्ये धावण्याचा विक्रम केला आहे.

Viral Video : कमाल आहे, पुरुषाने हाय हील्स घालून शंभर मीटर रेसमध्ये केला गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड
spain Image Credit source: socialmedia
| Updated on: Jun 26, 2023 | 6:43 PM
Share

मुंबई : हाय हील्सचे बुट घालून स्रियांना तोल सांभाळत हळुवार नाजूकपणे चालताना पाहिले असेल. या हाय हील्समुळे नवख्या तरुणींना अनेकवेळा अपघातांनाही सामोरे जावे लागते. तर अशा या नाजूक उंच टाचांच्या बुटांनी जेथे धड चालणेही आव्हान असते. तेथे अशा उंच टाचांच्या बुटांनी कोणी धावण्याचा जागतिक विक्रम केल्याचे कधी ऐकीवात तरी आले आहे का ? हो असा विक्रम चक्क एका हरहुन्नरी अवलियाने केला आहे.

हाय हिल्सचे बुट घालून फिरणे हे तशी पाहीली तर स्रियांची मक्तेदारी आहे. त्यांना उंच टांचाच्या बुटांनी चालण्यासाठी देखील सराव करावा लागत असतो. तसेच टाचा दुखण्याचाही आजार यामुळे येऊ शकतो, इतकी या हाय हिल्स धोकादायक असतात. परंतू या हाय हिल्स घालून स्पेनच्या एका हरहुन्नरी व्यक्तीने चक्क शंभर मीटर जलद धावण्याचा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

अनेक महिलांना जेथे हाय हिल्स घालून चालणे देखील आव्हान असते तेथे स्पेनच्या खिस्टीयन रोबर्टो लोपेझ रॉर्डीग्ज यांनी हाय हील्सने नुसचे चालणेच नव्हे तर त्यांनी त्यात वेगाने शंभर मीटर धावण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. 34 वर्षीय रॉर्डीग्ज याने 100 मीटरचे अंतर केवळ 12.82 सेंकदातच पार केले. आणि रॉर्डीग्जचा हा विक्रम जागतिक धावपटू हुसेन बोल्टच्या सर्वात जलद शंभर मीटर शर्यतीच्या विक्रमाला केवळ 3.24 सेंकद कमी पडला आहे.

हा पाहा व्हिडीओ –

गिनिज वर्ल्ड रेकॉर्डने ( GWR) इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करीत हा विक्रम जाहीर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन लिहीली आहे की, फास्टेस्ट 100 मीटर इन हाय हिल्स ( पुरुष ), खिस्ट्रीयन रॉबर्टो लोपेझ रॉर्डीग्ज याने 12.82 सेंकदात पार केले. खिस्ट्रीयन याच्या नावावर 57 वर्ल्ड रेकॉर्ड टायटल आहेत, या नव्या विक्रमासाठी त्याने कशी तयारी केली असे विचारले असता त्याने म्हटले की यासाठीची तयारी अतिशय व्यापक आणि विशिष्ट प्रकारे केली होती. उंच टाचांवर वेगाने धावणे मला खूप आव्हानात्मक वाटते. स्पेनमध्ये अशा प्रकारच्या शर्यती आहेत आणि त्या नेहमीच माझ्यासाठी उपयुक्त ठरल्या आहेत.

अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार.
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला.
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg.
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार.
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत.
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?.
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा.
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला.