खोल पाण्याची जादू, कितीही प्रयत्न केला तरी तुम्हाला शक्य होणार नाही ही एक गोष्ट!
पाण्यात अशी काही रहस्ये सामावलेली आहेत, जी अजूनही कोणालाच शोधता आलेली नाहीत. खोल समुद्रात तर काय-काय आहे? याचा आजही शोध घेतला जातो. पाण्याचे अनेक गुणधर्म असतात. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून या पाण्यात जाऊन ही एक गोष्ट करून दाखवाच, असे म्हटले जात आहे.

Viral Video : पाण्यामुळेच पृथ्वीवर जीवसृष्टी आहे. पृथ्वीवर पाणी नसतं काय झालं असतं याची कल्पनाच न केलेली बरी. या पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात आढळणारी गोष्ट म्हणजे पाणी. याच पाण्यात अशी काही रहस्ये सामावलेली आहेत, जी अजूनही कोणालाच शोधता आलेली नाहीत. खोल समुद्रात तर काय-काय आहे? याचा आजही शोध घेतला जातो. पाण्याचे अनेक गुणधर्म असतात. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून या पाण्यात जाऊन ही एक गोष्ट करून दाखवाच, असे म्हटले जात आहे.
नेमका कोणता व्हिडीओ व्हायरल होत आहे?
सध्या चर्चेत असलेला हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आलेला आहे. हा व्हिडीओ विजयकुमार राठोड नावाच्या सोशल खात्यावर अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती पारदर्शक पाण्यात उडी घेताना दिसत आहे. अत्यंत पारदर्शक असलेले हे पाणी नेमके कुठले आहे? असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत.
दगड वर आणण्याचा प्रयत्न करतेय व्यक्ती
विशेष म्हणजे या व्हिडीओच्या वर काही ओळी लिहिलेल्या आहेत. माणूस पाण्यातून हलकासा दगडसुद्धा उचलू शकत नाही ना, खरंय का हे? असा प्रश्न विचारण्यात आलाय. व्हिडीओमध्ये पाण्यात उडी घेणारी व्यक्ती अगदी तळाला जाऊन एक दगड उचलताना दिसत आहे. या व्यक्तीकडून उचललेला दगड वर आणण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र गुरुत्त्वाकर्षणामुळे संबंधित व्यक्ती हा दगड वर घेऊन येऊ शकत नाहीये. म्हणूनच या व्हिडीओवर आपण पाण्यातून एक दगडही वर आणू शकत नाही, असं म्हणण्यात आलंय.
View this post on Instagram
नेटकरऱ्यांकडून व्यक्त केल्या जातायत वेगवेगळ्या प्रतिक्रिया
दरम्यान, याच व्हिडीओची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. अनेकांनी हे बरोबर असल्याचे म्हटले आहे. तर आपण जास्त ताकद लावली तर पोहत-पोहत दगडाला वर घेऊन येणे शक्य होतो, असे मत काही लोकांनी व्यक्त केले आहे. हा व्हिडीओ 8 जुलै रोजी इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 50 हजारपेक्षा लाईक्स मिळाल्या असून अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत.
