Viral Video : तीन बायका फजिती ऐका, 500 रुपयांचा चक्रावून टाकणारा हिशोब; तुम्हीही लावाल डोक्याला हात
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. महिलांनी डोकं चक्रावून टाकणारा हिशोब केला आहे.

Viral Video News : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. इंटरनेटवर कधी एखाद्या कारचा व्हिडीओ व्हायरल होतो. तर कधी दोन बायकांमधील भांडण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. सध्या मात्र एक अजब-गजब व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये एकूण तीन महिलांनी चक्रावून सोडणारा पैशांचा हिशोब केला आहे. हातात 500 रुपयांची नोट घेऊन केलेला हा हिशोब सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय ठरतोय.
हिशोब पाहून तुम्ही विचारात पडाल
व्हायरल झालेला हा व्हिडीओ नेमका कुठला आहे. याबाबत नेमके समजू शकलेले नाही. मात्र या व्हिडीओत दिसणाऱ्या तीन बायकांनी लावलेला हिशोब पाहून तुम्ही विचारात पडाल. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत एकूण तीन महिला दिसत आहेत. या तिन्ही महिलांनी साडी परिधान केलेली आहे. घराच्या छतावर हा व्हिडीओ शूट केला आहे.
व्हायरल व्हिडीओत नेमके काय आहे?
व्हिडीओत अगोदर दोन महिला दाखवण्यात आलेल्या आहेत. यातील एक महिला दुसऱ्या महिलेला उसणे घेतलेले 1000 रुपये मागत आहे. माझे पैसे परत कधी करतेस, असं ती विचारताना दिसतेय. दोन महिलांचे हे संभाषण चालू असतानाच तिथे तिसरी महिला आलेली पाहायला मिळत आहे.
उधार लेना हो तो ऐसे दिमाग वाली से महिलाओं लेना 🤣🤓 pic.twitter.com/JshvgQnsLg
— Raksha Yatharth (@yatharth86) August 1, 2025
हिशोन नेमका कसा केला?
या तिसरी महिला हातात 500 रुपये घेऊन आलेली आहे. तिसऱ्या महिलेने अगोदरच्या दोन महिलांपैकी एका महिलेने उसणे घेतलेले 500 रुपये परत केले. त्यानंतर त्याच दुसऱ्या महिलेले ते 500 रुपये पहिल्या महिलेला दिले. पहिल्या महिलेने परत तेच 500 रुपये तिसऱ्या महिलेले उसणे घेलेले परत केले. अशाच पद्धतीने पुन्हा एकदा त्या 500 रुपयांची देवाणघेवाण झाली. अशा पद्धतीने शेवटी या तिन्ही महिलांनी एकमेकीकडे असलेल्या पैशांचा हिशोब पूर्ण केला आहे.
हा व्हिडीओ पाहून एक्स या समाजमाध्यमांवर @yatharth198 या खात्यावर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून तिन्ही महिलांनी हा हिशोब नेमका कसा केला? याचा शोध लावत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
