Video: 2 कोल्ह्यांवर 1 मांजर भारी, मांजरीला यापुढे भित्री म्हणण्याआधी तिच्या धाडसाचा हा व्हिडीओ पाहा

भित्रं मांजर हे आपल्याकडे सहज म्हटलं जातं. पण, मांजराचा स्वभाव वेळप्रसंगी किती आक्रमक असू शकतो हे आपण अनेक व्हिडीओमधून पाहिलं असेल. उगाच मांजरीला आपल्याकडे वाघाची मावशी म्हटलं जात नाही.

Video: 2 कोल्ह्यांवर 1 मांजर भारी, मांजरीला यापुढे भित्री म्हणण्याआधी तिच्या धाडसाचा हा व्हिडीओ पाहा
मांजराने त्यांना असा काही राग दाखवला की, कोल्ह्यांची मांजरांजवळ येण्याची हिंमत झाली नाही.

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. प्राण्यांचे व्हिडीओ तर सोशल मीडियावर लगेच व्हायरल होतात. त्यातीलच काही व्हिडीओ असे असतात, की जे पाहिल्यानंतर डोळ्यावर विश्वासच बसत नाही. जर हे प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाले नसते तर, कुणीही त्यावर विश्वास ठेवला नसता. असाच एक प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये 2 कोल्हे आणि 1 मांजराची लढाई दाखवण्यात आली आहे. (Viral video of Cat beats two foxes alone people were shocked after watching this)

भित्रं मांजर हे आपल्याकडे सहज म्हटलं जातं. पण, मांजराचा स्वभाव वेळप्रसंगी किती आक्रमक असू शकतो हे आपण अनेक व्हिडीओमधून पाहिलं असेल. उगाच मांजरीला आपल्याकडे वाघाची मावशी म्हटलं जात नाही. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. आता तुम्हाला विचारलं की, कोल्हा आणि मांजर यांच्या लढाईत कोण जिंकेल, तर तुमचं उत्तर कोल्हा असेच असेल.

पण, आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये याच्या अगदी उलटं घडताना दिसतं आहे. या व्हिडीओमध्ये एक नाही तर 2 कोल्हे आहेत आणि ते एका मांजरावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मांजराने त्यांना असा काही राग दाखवला की, कोल्ह्यांची मांजरांजवळ येण्याची हिंमत झाली नाही.

हा व्हिडीओ पाहा:

 

View this post on Instagram

 

A post shared by طبیعت (@nature27_12)

ही मांजर छपरावरुन चाललेली असते, तितक्या एक कोल्हा तिच्यावर हल्ला करतो. ती थोडी सांभाळते आणि त्यानंतर आक्रमक होते. तेवढ्यात दुसऱ्या बाजूला असलेला कोल्हाही तिथे येतो आणि दोघे मिळून मांजरीला घेरतात. पण मांजर काही कमी नाही. ती दोन्ही कोल्ह्यांवर भारी पडते. दोघांवरही ती धावून जाते आणि कोल्ह्यांना तिथून काढता पाय घ्यावा लागतो.

nature27_12 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जो पाहिल्यानंतर नेटकरी अवाक झाले आहेत. मांजरीचं हे धाडस पाहून अनेकजण मांजरीचं कौतुक करत आहेत. आतापर्यंत या व्हिडीओला हजारो लोकांनी पाहिलं आहे, शेकडोवेळा हा व्हिडीओ शेअर झाला आहे. इतर सोशल मीडियावरही हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामुळं यापुढे मांजरीला भित्री म्हणण्याआधी, तिची आक्रामकता आणि धाडस विसरु नका.

हेही पाहा:

Video: माकडाला जबरदस्ती केळी खाऊ घालण्याचा प्रयत्न अंगाशी, माकडाने चिडून जे केलं, त्यावर नेटकरी अवाक

Video | ताडोबाच्या जंगलात वाघीण-नर अस्वल आमनेसामने, झुंज कॅमेऱ्यात कैद

 

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI