Video: दीड वर्षाच्या वयात मोठ्यांनाही लाजवेल असा स्टंट, व्हिडीओ पाहून नेटकरी आवाक

लहान मुलं कधी काय करतील सांगता येत नाही, त्यांच्यातील कलागुण हे लहानपणीच कळू लागतात. अशाच एका लहान मुलाचा व्हिडीओ तुम्हाला आश्चर्यचकीत करेल.

Video: दीड वर्षाच्या वयात मोठ्यांनाही लाजवेल असा स्टंट, व्हिडीओ पाहून नेटकरी आवाक
अवघ्या दीड वर्षाच्या वयात शिडीवरुन उतरणारा चिमुरडा

सोशल मीडियावर दररोज काहीतरी व्हायरल होत असतं, यातील काही व्हिडीओ तुम्हाला बुचकळ्यात पाडतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. जे पाहून तुम्ही दाताखाली बोट दाबाल. लहान मुलं कधी काय करतील सांगता येत नाही, त्यांच्यातील कलागुण हे लहानपणीच कळू लागतात. अशाच एका लहान मुलाचा व्हिडीओ तुम्हाला आश्चर्यचकीत करेल. (Viral Video Of Kid Climbing off Very Easily People Were surprised)

दीड वर्षाच्या मुलाला नीट उभे राहणंही अवघड असतं, पण सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुम्ही थक्क व्हाल, कारण हा मुलगा त्याच्या वयात कुणीही करु शकणार नाही असा कारनामा करतो आहे. हा चिमुरडा शिडीवरुन असा सरसर उतरतो की आपल्याला प्रश्न पडतो की हे खरं आहे की नाही

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, आपण पाहू शकता की मूल शिडीच्या वरच्या बाजूस आरामात बसले आहे, पण तितक्यात त्याला खाली येऊ वाटतं, तेव्हा हा मुलगा शिडीवरुन भरभर खाली उतरत येतो. अगदी कुणा मोठ्यालाही असा स्टंट करता येणार नाही, असा स्टंट हा मुलगा करत आहे.

व्हिडीओ पाहा

 

View this post on Instagram

 

A post shared by Sachin Sharma (@helicopter_yatra_)

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर helicopter_yatra_ नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. 6 दिवसांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 84 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांनी खूप लाईक केला आहे. याच कारणामुळे अनेक युजर्सनी त्यावर मजेशीर कमेंट्स केल्या. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, हे दृश्य खरोखरच आश्चर्यकारक आहे. त्याचवेळी आणखी एका यूजरने लिहिले की, ‘आजकालच्या मुलांबद्दल काही सांगता येत नाही.’ याशिवाय इतर अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI