चहाप्रेमींनो, Noon chai केलाय का कधी ट्राय? कुठे आणि कसा मिळतो? पाहा ‘हा’ Viral video

Pink tea : व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओमध्ये (Video) तुम्ही पाहू शकता, की दुकानदार स्पेशल चहा बनवण्यासाठी कपमध्ये बटरसह (Butter) विविध पदार्थ टाकतो. विविध पदार्थ एकत्र केल्यानंतर दुकानदार त्या कपमध्ये पारंपरिक चहाच्या भांड्यातून गुलाबी रंगाचा चहा ओततो.

चहाप्रेमींनो, Noon chai केलाय का कधी ट्राय? कुठे आणि कसा मिळतो? पाहा 'हा' Viral video
लखनऊमधील चहाविक्रेत्याने बनवलेला गुलाबी चहाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 1:58 PM

Pink tea : जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात तुम्हाला चहाप्रेमी सापडतील. हे असे पेय आहे की प्रत्येकाला प्यायला आवडते. दुसरीकडे पहाटे एक कप कडक चहा घेतला तर दिवसभर ऊर्जा मिळते. त्यामुळेच चहाप्रेमी चहाचे वेगवेगळे प्रकार करून पाहत असतात. उदाहरणार्थ, रस्त्यावरील विक्रेते आणि रेस्टॉरंट्सनी आता तुमच्या सामान्य दिसणाऱ्या चहामध्ये विविध प्रकारचे फ्लेवर्स जोडले आहेत आणि त्यांची चवही अप्रतिम आहे. अलीकडे असाच चहा लोकांमध्ये चर्चेत आला आहे. व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओमध्ये (Video) तुम्ही पाहू शकता, की दुकानदार स्पेशल चहा बनवण्यासाठी कपमध्ये बटरसह (Butter) काय काय टाकतो. विविध पदार्थ एकत्र केल्यानंतर दुकानदार त्या कपमध्ये पारंपरिक चहाच्या भांड्यातून गुलाबी रंगाचा चहा ओततो. @yumyumindia नावाच्या एका फूड ब्लॉगरने इन्स्टाग्रामवर या गुलाबी चहाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, हे चहाचे दुकान लखनऊमध्ये आहे, जे लोकांना दुपारचा चहा वेगळ्या पद्धतीने देत आहे.

‘मुलींना खूप आवडेल’

हा चहा पाहून सोशल मीडिया यूझर्स आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूझरने लिहिले, ‘हा गुलाबी चहा नाही, दुपारचा चहा आहे.’ तर दुसऱ्या यूझरने लिहिले, की हा चहा त्या मुलींना खूप आवडेल ज्यांचा आवडता रंग गुलाबी आहे. दुसऱ्या यूझरने लिहिले, ‘ये कश्मीरी चाय और इसका टेस्ट एकदम नेक्सट लेवल है.’ याशिवाय इतर अनेक यूझर्सनी यावर कमेंट्सद्वारे त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या.

काश्मीर आणि लडाखमध्ये प्रसिद्ध

माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो, की हा गुलाबी रंगाचा चहा काश्मीर आणि लडाखमध्ये ‘नून चाय’ म्हणून प्रसिद्ध आहे, ज्याची चव खारट असते. नून चाय किंवा शीर चाय हा काश्मीरचा पारंपरिक चहा आहे. हे हिरवी पाने, दूध, मीठ आणि बेकिंग सोडा घालून बनवले जाते. नून म्हणजे मीठ समजले जाते. दुपारच्या चहामध्ये बेकिंग सोडा मिसळला जातो, त्यामुळे त्याचा रंग गुलाबी होतो. हा गुलाबी चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दुपारच्या चहामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात.

आणखी वाचा :

असले Stunt केल्यावर दात राहतील का जागेवर? लोक म्हणतायत, जास्त सिनेमे पाहिल्याचा हा परिणाम!

Fact Check : घरात चार्जिंगला लावलेल्या स्कूटर बाइकचा स्फोट, स्फोट नक्की कशानं? पाहा Video

Bear Grylls व्हायचंय की काय या चिमुकल्याला? पाहा, काय धाडस केलं! Video viral

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.