AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या घोड्याच्या डान्सपुढे सगळे डान्सर फेल, पाहा Viral Video

'पुष्कर मेळा' अनेक कारणासाठी प्रसिद्ध आहे. येथे ऊंट आणि घोडे देखील आपली कला दाखवतात. अशाच राणा नावाच्या घोड्याचे नृत्य पाहून लोक तोंडात बोट घालत आहेत.

या घोड्याच्या डान्सपुढे सगळे डान्सर फेल, पाहा Viral Video
Dancing Horse Rana
| Updated on: Nov 13, 2025 | 10:05 PM
Share

Viral Video: राजस्थानचा पुष्कर मेळा (Pushkar Mela 2025) जगभर प्रसिद्ध आहे. या मेळ्यात ऊंट आणि घोड्यांना सजवून आणले जाते. त्यात एका स्टाने इंटरनेटवर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा स्टार कोणी व्यक्ती नाही तर आलेला एक राणा नावाचा घोडा आहे. ज्याने त्याच्या (Dancing Horse Rana) पदलालित्याने आणि बहारदार नृत्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. लोक त्याला ‘डान्सिंग स्टार’ म्हणत आहेत.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की पुष्कर मेळ्यात एकीकडे ढोल आणि ताशे वाजत आहेत. तर या तालावर पांढरा शुभ्र घोडा तालावर नाचत आहे. त्यास त्याचा मालक लगाम पकडून नाचवत आहे. या राणाचे थिरकने पाहून तुम्हाला एखाद्या बॉलीवूड स्टारची आठवण येईल. संगितावर ठेका धरत त्याचे नाचणे, ठुमकणे आणि थिरकणे पाहून तुमची बोटे तोंडात जातील.

व्हिडीहओत तुम्ही पाहू शकता की जस जसी ढोलकीची थाप वेग पकडत तसा हा घोडा जोशात येऊन नाचू लागतो. अशा अंदाजात तुम्ही घोड्याला नाचताना कधी पाहिले नसेल, राणाचा हा अंदाजच निराळा आहे. त्याच्या समोर भलेभले डान्सर फेल होतील.

या अद्भुत व्हिडियोला इंस्टाग्राम पर @aryanbikaneri नावाच्या अकाऊंटने शेअर केले आहे. ज्यास आतापर्यंत 88 लाखाहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. यास 5 लाख 85 हजाराहून जास्त वेळा लाईक्स केले गेले आहे. एकूणच काय राणाच्या डान्सचे कौशल्य पाहून भलेभले डान्सप्रेमी हैराण झाले आहेत.

एका युजरने कमेंटमध्ये लिहीलंय की राणाजी मुझे माफ करना, आप डान्सर निकले. दुसऱ्याने म्हटले की समा बांध दिया राणाने. एका अन्य युजरे चिंता व्यक्त करत लिहीलेय की हा डान्स शिकण्यासाठी या राणाने अनेक चाबकाचे फटके खाल्ले असतील.

येथे पाहा व्हिडीओ –

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.