AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजबगजब मशिनी अन् मसाज थेरपी! जुन्या काळात अशा रहायच्या बायका एकदम फिट; दुर्मिळ Video पाहिलात का?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ पाहून तुम्हाला अंदाज येईल की 1940 च्या दशकातही महिलांना बारीक आणि फिट राहण्याचे प्रचंड क्रेझ होते. पण त्यांना बारीक करण्याचा मार्ग पाहून लोक थक्क झाले आहेत. कारण त्या काळात विचित्र मशिनींचा वापर केला जायचा, ज्या आजच्या काळातील कार्डिओ मशिनींपेक्षा पूर्णपणे वेगळ्या होत्या.

अजबगजब मशिनी अन् मसाज थेरपी! जुन्या काळात अशा रहायच्या बायका एकदम फिट; दुर्मिळ Video पाहिलात का?
gym videoImage Credit source: Instagram/@detailedexplanation
| Updated on: Sep 26, 2025 | 5:42 PM
Share

कधी विचार केला आहे का की 1940 च्या दशकात महिला जिममध्ये कशा जायच्या? नाही ना, मग आम्ही दाखवत असलेला व्हिडीओ नक्की पाहा. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ पाहून तुमचा विश्वास बसणार नाही. आजचे ट्रेडमिल आणि डंबल्स हे विसरुनच जा, कारण त्या काळातील ‘स्लिमिंग मशिन्स’ एखाद्या कॉमेडी चित्रपटाच्या सेटसारख्या वाटत आहे. तुम्हीही हा दुर्मिळ नजारा पाहा…

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवरून अंदाज लावता येतो की त्या काळातही महिलांना बारीक आणि फिट राहण्याचे प्रचंड क्रेझ होते. पण त्यांना बारीक करण्याचा मार्ग पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. कारण, त्या वेळी विचित्र मशिनींचा वापर केला जायचा. या मशिनी आजच्या कार्डिओ मशिनींपेक्षा पूर्णपणे वेगळ्या होत्या. या मशिनी पाहून तुम्हाला हसू अनावर होईल.

वाचा: तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती तेपण नवरात्रीमध्ये; न्यूड फोटोशूटमुळे मराठमोळी अभिनेत्री झाली ट्रोल

व्हायब्रेटिंग बेल्ट मशिन

कल्पना करा, त्या काळात महिलांच्या कंबर आणि मांड्यांवर एक रुंद बेल्ट घट्ट बांधला जायचा आणि मोटरद्वारे तो नियंत्रित केला जायचा. दावा केला जात आहे की यामुळे शरीरातील अनावश्यक चरबी गायब होत असे. हे पाहताना असं वाटतं जणू मशिन तुम्हाला जबरदस्तीने नाचायला लावत आहे.

रोलर आणि मसाज इक्विपमेंट

त्या वेळी लाकडी सिलेंडरसारखी उपकरणे असायची. ही उपकरणे शरीरावरील चरबी कमी करुन शरीर गुळगुळीत करायचे असा दावा करण्यात आला आहे. ही उपकरणे पाहिल्यावर असं वाटतं की, कुणीतरी सुताराच्या दुकानातील अवजारे जिममध्ये ठेवली आहेत. याशिवाय, जिममध्ये काही खुर्च्या असायच्या, ज्या आपोआप हळूहळू शरीराला हलवायच्या. होय, अगदी बरोबर समजलात. मेहनत न करता बारीक होण्याचं वचन. म्हणजेच, त्या काळातही जबरदस्त मार्केटिंग होतं.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @detailedexplanation या पेजवरून शेअर करण्यात आला आहे, जो काही तासांतच व्हायरल झाला आहे. लोक या व्हिडीओवर भरपूर कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिलं, “हे पाहून मला तर हसू आवरलं नाही.” दुसऱ्या युजरने चेष्टा करत म्हटलं, “त्या काळातही लोक जिममध्ये स्वतःचे व्हिडीओ बनवायचे.” सर्वात मजेदार कमेंट होती, “ही जिम कमी आणि छळ ज्यादा वाटतोय.”

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.