Video: महिलेच्या कानात शिरला साप, थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका महिलेच्या कानातून साप बाहेर पडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील चकीत व्हाल

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नसतो. सध्या सोशल मीडियावर थरकाप उडवणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे, सापासारखा विषारी प्राणी त्या महिलेच्या कानात कसा शिरला? हे गुपित अद्याप उलगडलेले नाही आणि हा व्हिडिओ कधीचा, कुठला आहे याविषयीची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण हा व्हिडीओ सोशल मीडियावर जंगलात लागलेल्या आगीसारखा पसरला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.
एखाद्या व्यक्तीच्या कानात साप शिरणं ही काही साधी बाब नाही. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती महिलेच्या कानातून साप काढण्याचा अयशस्वी प्रयत्न करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहाल की, जेव्हा ही व्यक्ती चिमट्याने सापाला पकडण्याचा प्रयत्न करते, तेव्हा ती महिला वेदनेने कळवळते आणि स्थानिक भाषेत काहीतरी बोलू लागते. जणू ती त्या व्यक्तीला म्हणत आहे, “थांब-थांब, साप हालचाल करतोय.” हे खरंच एक भयावह दृश्य आहे. वाचा: ६५ वर्षीय आजीचे २० वर्षीय तरुणावर प्रेम, सुनेने नको ते कृत्य करताना पकडलं अन्…
View this post on Instagram
नेमकं काय घडलं?
व्हिडीओमध्ये दिसतं की, ती व्यक्ती लहान चिमट्याने सापाला बाहेर ओढण्याचा प्रयत्न करत आहे. यासोबतच, त्याची काळजीही घेत आहे की सापाला कोणतीही इजा होऊ नये. दुसरीकडे, त्या महिलेच्या चेहऱ्यावर भीती आणि वेदनेचे भाव स्पष्ट दिसत आहेत. तिच्यासाठी हे किती असह्य आहे हे दिसून येत आहे. मात्र, या व्हिडीओमागचे सत्य अद्याप समोर आलेले नाही.
@therealtarzann या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करत, “कल्पना करा, तुम्ही झोपेतून उठलात आणि तुमच्या कानाबाहेर सापाची शेपटी लटकत आहे, तर तुम्ही पुढे काय कराल?” असे कॅप्शन देण्यात आले आहे. या पोस्टला दीड लाखांहून अधिक लोकांनी लाइक केलं आहे. तसेच कमेंट सेक्शनमध्ये लोक आश्चर्यचकित होऊन आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.
नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया
एकाने लिहिलं, “हा व्हिडीओ पाहून माझी धडधड वाढली.” दुसऱ्या यूजरने म्हटलं, “साप कसा शिरला याचा विचार करून मी थक्क आहे.” तर तिसऱ्या यूजरने कमेंट केलं, “असं भयानक दृश्य मी यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं.”
