Viral video : दोन मित्रांचं बर्फाळ जंगलात वर्कआऊट, अचानक आला अस्वल, पाहा पुढे नेमकं काय झालं?

बर्फाळ जंगलात दोन मित्र वर्कआऊट करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. विशेष म्हणजे या व्हिडीत अस्वल देखील या दोन्ही मित्रांसोबत वर्कआऊट करतोय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरुन चांगलाच व्हायरल होतोय. यावर अनेक नेटिझन्सकडून रंजक प्रतिक्रियाही आल्या आहेत.

Viral video : दोन मित्रांचं बर्फाळ जंगलात वर्कआऊट, अचानक आला अस्वल, पाहा पुढे नेमकं काय झालं?
Image Credit source: twitter
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शुभम कुलकर्णी

Mar 11, 2022 | 9:47 AM

मुंबई : आरोग्याबद्दल सजग असणारे, वेळच्यावेळी व्यायाम (workout) करणारे अनेक लोक आपण आपल्या अवतीभोवती पाहत असतो. असाच एक व्हिडीओ व्हायरल झालाय. यामध्ये दोन फिटनेस फ्रीक मित्र त्यांच्या रोजच्या रुटीनचा भाग म्हणून बर्फाळ जंगलात वर्कआऊट करत होते. आता बर्फाळ प्रदेश असल्यानं त्याठिकाणी अस्वल असणारच. या व्हिडीओत देखील दोन्ही मित्रांच्या मागे अस्वल अचानक आलेला दिसून येतोय. विशेष म्हणजे हा अस्वल देखील या दोन्ही वर्कआऊट करणाऱ्या मित्रांसोबत वर्कआऊट करतो. तपकिरी रंगाचा मोठा अस्वल या दोन्ही मित्रांच्या वर्कआऊट सेशनचा एक भाग झाल्याचं हा व्हिडीओ पाहिला की दिसून येतं. अनेकदा असं म्हटलं जातं की, प्राण्यांना जितकं प्रेम दिलं, जितका जिव लावला तितकच खेळीमेळीनं ते माणसासोबत वागतात. अशीच प्रचिती या व्हायरल व्हिडीओमधून (viral video) समोर येते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरुन (social media) चांगलाच व्हायरल होतोय. यावर अनेक नेटिझन्सकडून रंजक प्रतिक्रियाही आल्या आहेत.

अस्वलाचं फांदीसोबत पुश-अप

हो, अस्वल या वर्कआऊट करणाऱ्या दोन्ही मित्रांसोबत इतका रमलाय की, तो त्यांच्यासोबत वर्कआऊट करतानाही दिसून येतोय. यो व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन्ही मित्र पुढे आपला व्यायम करतायेत. तर दुसरीकडे मागच्या बाजूला अस्वल पुश-अप करताना दिसून येतोय. यातून व्यायामाप्रती या दोन्ही मित्रांची असलेली निष्ठा आणि अस्वलानंही त्यांच्यासोबत व्यायाम करण्याचा घेतलेला ध्यास स्पष्ट दिसून येतोय. अस्वल या दोन्ही मित्रांची नक्कल करताना दिसून येतोय.

पाहा हा व्हायरल व्हिडीओ

नेटीझन्सलाही वाटलं आश्चर्य

माणसासोबत प्राणी वर्कआऊट करतोय, हे ऐकुण कुणालाही आश्चर्य वाटेल. अनेकजण तर विश्वास देखील ठेवणार नाही. मात्र, या व्हिडीओत चक्क अस्वल या वर्कआऊट करणाऱ्या दोन मित्रांसोबत व्यायाम करताना दिसून येतोय. आतापर्यंत या व्हिडीओला ट्विटरवर 2 कोटी 92 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. मात्र, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे. याविषयी कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

इतर बातम्या

टीम इंडियातून बाहेर झाल्यानंतर चेतेश्वर पुजाराला ‘या’ संघाने दिला आधार, पाकिस्तानच्या सुपरस्टार खेळाडूसोबत खेळणार

दुष्काळात तेरावा: कीटनाशकांच्या फवारणीनंतर द्राक्ष बागा जळाल्या घडही सुकले, पंढरपुरात नेमकं असे का घडले?

पाच राज्यातील विधानसभा निकालानंतर इंधनाचे नवे दर जाहीर, जाणून घ्या आजचे पेट्रोल, डिझेलचे भाव

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें