‘इंग्रजीमुळे माझं आयुष्य बरबाद झालं’… महिलेचा हा मजेशीर Video पाहून तुम्ही हसून व्हाल लोटपोट
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून लोकांना हसूच आवरेना. ती महिला म्हणते की ती तिच्या पतीच्या इंग्रजीने इतकी प्रभावित झाली की तिने त्याच्याशी लग्न केले. पण नंतर कळले की तो जे काम करतो ते काही फार मोठे नाहीये. विनोदी पध्दतीने बनवलेल्या या व्हिडिओ मध्ये एक गमतीशीर गोष्ट आहे.

आजच्या काळात काही लोक इंग्रजीला फक्त एक भाषा मानत नाहीत तर एक स्टेटस सिम्बॉल मानतात. लोकांना वाटते की इंग्रजीत संवाद साधणारे उच्च दर्जाचे असतात. चांगल्या समाजात राहत असावे. चांगले कमावणारे असावेत. पण बऱ्याचदा लोक इंग्रजी भाषेच्या विळख्यात ऐवढे अडकतात आणि एखाद्या व्यक्तीचे खरे व्यक्तिमत्व समजू शकत नाही. मात्र तोपर्यंत खुप उशीर झालेला असतो. काही दिवसांन पुर्वी असाच एक प्रकार सोशल मीडीयावर चर्चेत आहे, ज्यामध्ये एका महिला असे म्हणते की इंग्रजीमुळे तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे.
तसे, भाषेच्या आधारे एखाद्याच्या क्षमतेचे किंवा सामाजिक स्थितीचे मूल्यांकन करणे किती दिशाभूल करणारे असू शकते याचा एक मोठा किस्सा या गंमतीशीर व्हिडिओमध्ये दडलेला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये महिलेने इंग्रजी भाषेच्या जाळ्यात अडकल्याने तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचे म्हटले आहे. त्या महिलेने पुढे सांगितले की ‘पतीने’ त्याच्या नोकरीचे इंग्रजीत ज्या पध्दतीने वर्णन करून सांगितले. व तिला कसे प्रभावित केले, त्यानंतर ही इंग्रजी भाषा त्या महिलेसाठी एक समस्येचे कारण बनले. कसे ते जाणून घेऊयात…




शालिनी पंडित ही महिला एक कंटेंट क्रिएटर आहे आणि ती विनोदी व्हिडिओ बनवण्यासाठी ओळखली जाते. या महिलेने मनोरंजनाच्या उद्देशाने हा असाच एक व्हिडिओ बनवला आहे, जो लोकांना खूप आवडला आहे. व्हिडिओमध्ये शालिनी म्हणते, लग्नापूर्वी मी माझ्या पतीला विचारले, तू काय काम करतोस? यावर पतीने सांगितले की, त्यांची एक संस्था आहे जी ऑटोमोबाईल्सच्या कंपन्याशी डिल करते. यानंतर त्या महिलेच्या पतीने सांगितले की, गाडीच्या तळाशी जे चार एलिमेंट्स असतात, त्यांच्यामधील चूका शोधून त्यांना दुरूस्त करून देण्याचे काम ते करत असतात. पतीचे इंग्रजीमध्ये हे बोलण ऐकल्यानंतर महिलेला असं वाटले की तिचे पती मोठ्या पोस्ट वर काम करत आहेत. नंतर ही महिला सांगते की, लग्न झाल्यावर समजले की तिचा नवरा हा गाडीच्या टायरचे पंक्चर काढण्याचे काम करतो. हे समजल्यावर महिला सांगते की इंग्रजीमुळे तिची लाईफ बरबाद झाली. इंग्रजी समजत असती तर तेव्हा समजल असतं नवरा कुठे काम करतो. असं म्हणत महिलेने एक मजेशीर व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
View this post on Instagram
@i_shalini_pandit इंस्टाग्राम हँडलने शेअर केलेला हा व्हिडिओ इंटरनेटवर तूफान व्हायरल होत आहे. आत्तापर्यंत या व्हिडीओ 65 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर दोन लाखांहून अधिक लोकांनी याला लाईक केले आहे. या मजेशीर व्हिडीओवर कमेंटचा पाऊस पडला आहे. यात एका युजरने लिहिले, नवरा खूप आशादायी निघाला. दुसऱ्या युजरने तर खिल्ली उडवली, लो भैया, आयुष्यच पंक्चर झाले आहे. तर एका यूजरने कमेंट केली की, तुम्ही काहीही म्हणा, भाईसाबची इंग्रजी दमदार होती.