AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video | प्रेमासाठी वाट्टेल ते…प्रेयसीसाठी प्रियकराने आणला चक्क ‘चांद का तुकडा’, पहा प्रेमात पाडणारा हा व्हायरल व्हिडिओ

असाच रंजक अनुभव देणारा व्हिडीओ सोशल मीडियात(Social Media) भलताच व्हायरल झाला आहे. प्रेयसीच्या खुशीसाठी प्रियकर हवेत कार उडवतो काय? चंद्राजवळ ती कार उभी करतो काय? अन् हवेतूनच चंद्राचा तुकडा जमिनीवर पाडतो काय? (watch this viral video that makes you fall in love, boyfriend brought piece of moon for his girlfriend)

Viral Video | प्रेमासाठी वाट्टेल ते...प्रेयसीसाठी प्रियकराने आणला चक्क 'चांद का तुकडा', पहा प्रेमात पाडणारा हा व्हायरल व्हिडिओ
प्रेमासाठी वाट्टेल ते...प्रेयसीसाठी प्रियकराने आणला चक्क 'चांद का तुकडा'
| Updated on: May 18, 2021 | 11:04 PM
Share

मुंबई : तुझ्यासाठी वाट्टेल ते करेन, अगदी नभांगणातील चंद्र-तारेही खाली आणेन. प्रियकराने प्रेयसीला दिलेले हे वचन असेल. प्रेयसीच्या खुशीसाठी चंद्र-तारे जमिनीवर आणण्याची प्रियकराची ही धमक म्हणजे एक कल्पनाविश्वच. पण आपल्या नजरेसमोर असे घडले तर, तो अनुभव किती रंजक असेल ना. होय, असाच रंजक अनुभव देणारा व्हिडीओ सोशल मीडियात(Social Media) भलताच व्हायरल झाला आहे. प्रेयसीच्या खुशीसाठी प्रियकर हवेत कार उडवतो काय? चंद्राजवळ ती कार उभी करतो काय? अन् हवेतूनच चंद्राचा तुकडा जमिनीवर पाडतो काय? अन् मग सुखद धक्का बसलेल्या प्रेयसीच्या चेहऱ्यावर चांदणीसारखंच लख्ख हसू तरळते काय? ही सगळी धम्माल तुम्हाला व्हिडीओतून नक्कीच अनुभवता येईल. सोशल मीडियातील इतर व्हिडीओंपेक्षा हा व्हिडीओ कैकपटीने हटके आहे, एवढं मात्र नक्की. (watch this viral video that makes you fall in love, boyfriend brought piece of moon for his girlfriend)

काय आहे व्हिडिओमध्ये?

जो कुणी या चंद्राचा तुकडा(Piece of Moon) माझ्यासाठी घेऊन येईल, तो माझा नवरा(Life Partner) होईल. त्यावर व्हिडिओमधील एक महिला विचारते, चंद्राचा तुकडा? म्हणजे चंद्रा(Moon)ला जमिनीवर आणावे लागेल. हे कसं शक्य आहे? त्यावर ती तरुणी म्हणते, जो अशक्य गोष्टी शक्य करेल तोच माझा नवरा होण्याच्या लायक असेल. त्यानंतर हिरो(प्रियकर) आपल्या हिरोईन(प्रेयसी)साठी रश्शीने चंद्रा(Moon)ला जमिनीवर खेचत आहे. चंद्रा(Moon)ला जमिनीवर आणण्यासाठी सर्व ताकद पणाला लावून तो चंद्रा(Moon)ला खेचताना दिसत आहे. तेथे उपस्थित असलेले कुटुंबातील इतर सदस्यही प्रेयसीची अट पूर्ण करण्यासाठी प्रियकराला चंद्र(Moon) जमिनीवर आणण्यासाठी मदत करताना दिसत आहेत. तर एक महिला अजून खेचा असे ओरडत आहे. हे सुरु असताना बंगल्याच्या वरच्या मजल्यावर एक जादूगर वाटणारा तरुण हिरो(प्रियकर)ला सांगतो, बरं झालं नवाब साहेब चंद्राला जवळ आणलंत. त्यानंतर हिरो(प्रियकर) कारमध्ये बसलेला दिसतो. त्यावर घरातील एक महिला विचारते, अमन कारने जाणार का?

कारमध्ये बसून हिरो(प्रियकर) हातातील जादूची काठी वर करुन काही तरी बोलतो आणि कार हवेत उंच उडायला लागते. ते पाहून घरातील सर्व सदस्यांच्या काळजात चर्र करते. हे दृश्य पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर एक अनामिक भिती दिसते. मात्र हिरो(प्रियकर) वेगात आपली चंद्रा(Moon)जवळ घेऊन जातो आणि आपल्याजवळील काठी चंद्रा(Moon)च्या दिशेने वर करुन जादूचा मंत्र बोलतो. असे करताच चंद्रावर जोरात आघात होऊन चंद्राचे तुकडे(Piece of Moon) होतात आणि एक तुकडा तरुणीच्या घरासमोर पडतो. हे पाहताच सर्व जण अत्यंत आनंदी होतात आणि व्हिडिओचा हॅप्पी एन्ड(Happy End) होतो.

आहे ना हा व्हिडिओ तुम्हालाही प्रेमात पाडणारा. किंबहुना तुम्ही हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करण्याच्या तयारीतही असाल. (watch this viral video that makes you fall in love, boyfriend brought piece of moon for his girlfriend)

इतर बातम्या

जखम असल्यास पावसात जाऊ नका, अन्यथा ‘या’ आजाराचा धोका, बीएमसीचा मुंबईकरांना इशारा

ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर X का लिहितात, छोट्या बोर्डवर लिहिलेल्या LV चा अर्थ काय?

फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.