ही फिटनेस कोच 55 व्या वयात दिसते पस्तीशीची, सौदर्याचे गुपित काय ?
फिटनेस कोच आंद्रिया सनशाईन या त्यांच्या ब्युटी आणि हेल्थ हॅक्स संदर्भात सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्यांनी मागे त्या वर्षभरात ५४०० अंडी फस्त करतात असे सांगून खळबळ उडवली होती.

तुम्ही चित्रपटातील एखाद्या कॅरेक्टरला दूधाने अंघोळ करताना पाहिले असेल. परंतू वास्तवात कोणी असे करते का ? अलिकडेच एका आजीच्या वयाच्या महिला फिटनेस कोचने तिच्या तरुण दिसण्याचे गुपित उघडले आहे. आपण दूधाने अंघोळ केल्याने तरुण दिसत असल्याचे या फिटनेस कोचने म्हटले. ही फिटनेस कोच प्रत्यक्षात ५५ वर्षांची आहे, परंतू दिसतेय ३५ वयाची. यामुळे तरुण देखील या फिटनेस कोचवर फिदा होत आहेत.
५५ वर्षाच्या फिटनेस कोच आंद्रिया सनसाईन अलिकडे सोशल मीडियावर अनोख्या ब्युटी आणि हेल्थ हॅक्समुळे चर्चेत आहे. मागे ती वर्षभर ५४०० अंडी खाऊन चर्चेत आली होती. परंतू आता तिने तिचे राज उघड केले आहे. दूधापासून अंघोळ केल्याने आपण सुंदर दिसत असल्याचे तिने म्हटले आहे.दूधाने अंघोळ केल्याने आपल्याला तरुण, ग्लोईंग आणि फिट असल्यासारखे वाटते. आंद्रिया हिने सांगितले ती नेहमी इतिहासात साहसी आणि कणखर महिला संदर्भात वाचत रहायची. इजिप्तची प्रसिद्ध राणी क्लिओपात्रा दूधाने अंघोळ करायची असे म्हटले जाते. यापासून प्रेरणा घेत आंद्रिया हीने स्वत: या पद्धतीचा स्वीकार करण्याचा निर्णय घेतला.
दूधाने अंघोळ करणे
नीड टू नो वेबसाईटच्या बातमीनुसार त्यांनी सांगितले की, ‘ क्लिओपात्रा दूधाने तिची त्वचा तरुण ठेवायची मी विचार केला होता की का नाही मी देखील यास आजमावून पाहावे. प्रत्येक महिला सेल्फ केअरची हक्कदार आहे.’ तिच्या व्हायरल क्लिपमध्ये आंद्रिया टबमध्ये बसलेली दिसत आहे. आणि स्वत:च्या अंगावर दूध टाकताना दिसत आहे. इंस्टाग्रामवर त्यांनी काही दिवसांपूर्वी दूधाने अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल केले होते. अनेक लोकांनी तिला असे करताना पाहून आश्चर्य व्यक्त केले. तर काही लोकांनी कौतूक देखील केले आहे.
