Gopi Bahu 2.0 : ही तर नवी गोपी बहू ! लॅपटॉप घेऊन लाटल्या पुऱ्या.. व्हिडीओ पाहून खो-खो हसाल..
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक महिला लॅपटॉपवर कणकेचे गोळे ठेवून ते दाबते आणि नंतर त्याची पुरी करून तळते. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही.

तुम्ही सोशल मीडियावर अनेक जुगाड पाहिले असतील, पण यावेळी व्हायरल होणाऱ्या व्हिडिओने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. “जिथे इच्छा असते तिथे मार्ग असतो” अशी एक म्हण आहे, पण इथे आपल्याला “जिथे लॅपटॉप असतो तिथे मार्ग असतो” अशी नवी म्हण तयार करावी लागेल. कारण या व्हिडिओमध्ये, एका घरातील सुनेनं असं काही केलं आहे जे आयटी इंजिनिअरही करू शकत नाही. स्वयंपाकघरात उभी असलेली ही सून पुऱ्या लाटण्यासाठी पोलपाट-लाटण्याचा वापर करत नाही तर तिने वापरला चक्क लॅपटॉप.. हो हो, लॅपटॉप! तोदेखील असा लॅपटॉप, जो दररोज ऑफिसच्या कामासाठी वापरला जातो, पण तोच लॅपटॉप घेऊन या बहुरानीने त्याचं ‘जुगाडू पोळपाट लाटणं 2.0’ बनवलं आहे.
लॅपटॉपवर लाटल्या पुऱ्या
व्हायरल व्हिडिओमध्ये, एका घरातील महिलेने स्वयंपाकघरात मोठ्या आत्मविश्वासाने पुऱ्या बनवल्या, पण तिची पद्धत अशी आहे की ती पाहून तुम्ही थक्क व्हाल. सहसा पुऱ्या लाटण्यासाठी आपण पोळपाट-लाटणं वापरतो ना.. परंतु या पण या महिलेने स्वयंपाकघरात नव तंत्रज्ञान देखील घुसवलं आहे. तिने तिचा लॅपटॉप उघडला आणि त्यावर पॉलिथिन शीट पसरवली, नंतर त्यावर कणकेचे सहा गोळे ठेवले, आणि त्यावर पुन्हा प्लास्टिक शीट ठेवली. मग लॅपटॉप बंद करून त्याचा दाब देून पुऱ्या लाटल्या. हा जुगाड पाहून सोशल मीडिया युजर्स थक्क झाले आहेत.
View this post on Instagram
5-6 पुऱ्या एकदम लाटल्या
या व्हिडिओमध्ये एकदम स्पष्टपणे दिसलं की सुनेने लॅपटॉपला तिचे स्मार्ट किचन मशीन कसे बनवलं… लॅपटॉपवर एकाच वेली 5-6 पुऱ्या तयार झाल्या. लॅपटॉप बंद करताच, आत ठेवलेल्या कणकेच्या गोल्या आपोआप फ्लॅट झाले आणि पुऱ्यांच्या आकारात आले. या फटाफट, वेगवान तंत्रज्ञानाने प्रभावित होऊन, लोकांनी भन्नाट कमेंट केल्या. “हेचं खरं वर्क फ्रॉम होम” अशी कमेंट काहींनी केली. “ऑफिस लॅपटॉप इतक्या लवकर का खराब होतात हे आता मला समजले आहे” अशी मिश्किल टिप्पणी देखील दुसऱ्याने केली.
वा गोपी बहू ना.. नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
हा व्हिडिओ radhikamaroo नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे आणि अनेकांनी व्हिडिओला लाईक देखील केले आहे. त्यावर सोशल मीडिया यूजर्सनी अनेक प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. गोपी बहू कधी सुधारणार नाही, असं एकाने लिहीलं. खूप चुकीच्या लोकांकाडून प्रेरणा घेतली असं दुसऱ्याने लिहीलं. वाह दिदी वाह.. तू तर गोपी बहूपेक्षाही पुढे गेलीस, अशी मजेशीर कमेंटही एका यूजरने लिहीली
